शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी, अमित शहांविरोधातील 'तो' खटला अमेरिकन न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:53 IST

फुटीरवादी काश्मीर खलिस्तान संघटना सुनावणीस गैरहजर

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात फुटीरवादी काश्मीर खलिस्तान संघटना आणि इतर दोघांनी दाखल केलेला १०० दशलक्ष डॉलर्सचा खटला अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळून लावला. फुटीरवादी काश्मीर खलिस्तान संघटना आणि इतर दोघे दोन वेळा सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे खटला निकाली काढण्यात आला. टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाच्या काहीच दिवस आधी हा खटला १९ सप्टेंबर, २०१९ रोजी दाखल केला गेला होता. जम्मू आणि काश्मीरचा घटनेतील विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय भारतीय संसदेने घेतला होता. या निर्णयाला या खटल्याद्वारे आव्हान दिले गेले होते आणि १०० दशलक्ष डाॅलर्सची भरपाई मोदी आणि शहा तसेच लेफ्टनंट जनरल कंवल जीत सिंह धिल्लन यांच्याकडून मागण्यात आली होती. धिल्लन हे सध्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे महासंचालक आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफअंतर्गत इंटेग्रेटेड डिफेन्स स्टाफचे उपप्रमुख आहेत.हे प्रकरण चालण्यासाठी काश्मीर खलिस्तान रेफरंडम फ्रंटने काहीही केलेले नाही आणि सुनावणीच्या दिलेल्या दोन तारखांनाही हजर राहिलेले नाही, असे अमेरिकेच्या डिस्ट्रिक्ट कोर्ट सदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ टेक्सासचे न्यायमूर्ती फ्रान्सिस एच. स्टॅसी यांनी सहा ऑक्टोबर रोजीच्या आदेशात म्हटले व हा खटला निकाली काढण्याची शिफारस केली. हे प्रकरण टेक्सासमधील जिल्हा न्यायालयाने २२ ऑक्टोबर रोजी समाप्त केले. टीएफके आणि एसएमएस कोण ?काश्मीर खलिस्तान रेफरंडम फ्रंट शिवाय इतर दोन तक्रार करणारे टीएफके आणि एसएमएस या आद्याक्षरांशिवाय कोण होते, हे स्पष्ट झाले नाही. खटला दाखल करणाऱ्यांची बाजू गुरपतवंत सिंग पन्नून यांनी मांडली. न्यायालयातील दप्तरानुसार काश्मीर खलिस्तान रेफरंडम फ्रंट मोदी, शहा आणि धिल्लन यांना १८ फेब्रुवारी, २०२० रोजी ह्यूस्टनमध्ये भारतीय वकिलात समन्स देऊ शकत होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा