India on Russian Oil: "भारतानेरशियाकडून अतिरिक्त कच्चे तेल न खरेदी करण्याचे आश्वासन अमेरिकेला दिले आहे," असा मोठा दावा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी म्युनिक सुरक्षा परिषदेत केला आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर निर्बंध अधिक कडक करण्यासाठी अमेरिकाभारतावर दबाव निर्माण करत असतानाच हे विधान आले आहे. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या स्वतंत्र धोरणाचा पुनरुच्चार करून या दाव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मार्को रूबियो यांचा दावा काय?
म्युनिकमध्ये बोलताना रूबियो म्हणाले की, "आमच्या भारतासोबतच्या चर्चेत त्यांनी रशियाकडून अतिरिक्त तेल खरेदी न करण्याचे मान्य केले आहे. युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी रशियावर दबाव टाकण्याच्या आमच्या धोरणाचा हा एक भाग आहे." मात्र, हे आश्वासन केवळ अतिरिक्त खरेदीसाठी आहे की सध्या सुरू असलेल्या करारांसाठीही, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
'आमचा निर्णय आम्हीच घेणार'; एस. जयशंकर यांचे चोख प्रत्युत्तर
अमेरिकेच्या या दाव्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. "भारत आपल्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी धोरणाशी ठाम आहे. जागतिक तेल बाजार अत्यंत गुंतागुंतीचा आहे. तेल कंपन्या उपलब्ध उपलब्धता, खर्च आणि जोखीम पाहून निर्णय घेतात. भारताच्या राष्ट्रीय हिताला जे योग्य वाटेल, तोच निर्णय आम्ही घेऊ," असे जयशंकर यांनी ठणकावून सांगितले.
भारत-अमेरिका व्यापार कराराची पार्श्वभूमी
नुकत्याच झालेल्या भारत-अमेरिका व्यापार चर्चेत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अमेरिकेने भारतावर लादलेले ५० टक्के टॅरिफ आता १८ टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. भारत आता अमेरिकेकडून अधिक प्रमाणात औद्योगिक वस्तू आणि कृषी उत्पादने आयात करेल. भारतीय वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू आणि मशिनरींवरील टॅक्स अमेरिकेने कमी केला आहे.
'केवळ ट्रम्पच असे बोलत आहेत'
दुसरीकडे, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी अमेरिकेचा दावा फेटाळून लावला आहे. "अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशिवाय इतर कोणीही असा दावा केलेला नाही की भारत रशियन तेल खरेदी बंद करेल. भारताच्या कोणत्याही नेत्याने किंवा खुद्द पंतप्रधान मोदींनी अशी कोणतीही पुष्टी दिलेली नाही," असे लावरोव यांनी सांगितले.
भारतासाठी ऊर्जा सुरक्षा महत्त्वाची
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनीही स्पष्ट केले आहे की, १४० कोटी जनतेची ऊर्जा सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. भारत कोणत्याही एका देशावर अवलंबून नसून डझनभर देशांकडून तेल आयात करतो. त्यामुळे कमी दरात तेल मिळवणे हा भारताचा असलेला अधिकार आहे.
Web Summary : India refutes US claims of halting Russian oil purchases, asserting its sovereign right to decide based on national interest and strategic autonomy. External Affairs Minister Jaishankar emphasized India's diversified oil sourcing amid global market complexities.
Web Summary : भारत ने रूस से तेल खरीद रोकने के अमेरिकी दावे का खंडन किया, और राष्ट्रीय हित व रणनीतिक स्वायत्तता के आधार पर निर्णय लेने के अपने संप्रभु अधिकार पर जोर दिया। विदेश मंत्री जयशंकर ने वैश्विक बाजार की जटिलताओं के बीच भारत की विविध तेल स्रोतों पर बल दिया।