शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तालिबान्यांच्या ताब्यातून अमेरिकी-कॅनेडियन कुटुंबाची सुटका, पाकवर अमेरिकेचा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 12:11 IST

दहशतवादी संघटनांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेऊन त्यांच्यावर कारवाई न करण्याच्या आरोपांनी घेरलेल्या पाकिस्तानवर आता अमेरिकेनं मोठ्या प्रमाणात दबाव टाकला आहे.

इस्लामाबाद- दहशतवादी संघटनांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेऊन त्यांच्यावर कारवाई न करण्याच्या आरोपांनी घेरलेल्या पाकिस्तानवर आता अमेरिकेनं मोठ्या प्रमाणात दबाव टाकला आहे. पाकिस्तानसुद्धा अमेरिकेच्या दबावापुढे काहीसा झुकताना पाहायला मिळतोय. पाकिस्ताननं अफगान तालिबानशी संबंधित असलेली दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या ताब्यातून अमेरिकी- कॅनेडियन कुटुंबाला सुरक्षित वाचवण्यासाठी मदत केली आहे.दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या दबावाखाली असल्यानंच पाकिस्ताननं ही कारवाई केल्याची चर्चा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवाती अमेरिकी नागरिक व त्यांचे कॅनेडियन पती यांच्या सुरक्षितरीत्या सुटका होणार असल्याचं जाहीर केलं होतं. दोघांनाही 2012पासून हक्कानी नेटवर्कनं ओलीस ठेवलं होतं. या दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कला अमेरिकेनं आयएसआयची सहाय्यक संघटना म्हणून संबोधित केलं होतं. पाकिस्तान सरकारसोबत मिळून आम्ही बॉयले-कोलमॅन यांची सुटका सुनिश्चित केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. तसेच ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभारही मानले आहेत.परंतु ट्रम्प यांनी याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे 2012पासून ओलीस ठेवण्यात आलेल्या अमेरिकी- कॅनेडियन दाम्पत्यानं तीन मुलांनाही जन्म दिला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त करण्याचं जाहीर केलं होतं. अमेरिकेनं दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कविरोधात पुरावे दिल्यास आम्ही त्यांना नष्ट करू, असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलं होतं. अमेरिकेनं पुरावे दिल्यास आम्ही अमेरिकेसोबत हक्कानी नेटवर्कवर संयुक्त कारवाई करू, असंही आसिफ म्हणाले होते. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हक्कानी नेटवर्कला पाकिस्तान सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे अमेरिकेच्या आर्थिक सहाय्याच्या बळावर अमेरिकेच्याच सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरायचं, असा हा पाकिस्तानचा एकूण प्रकार होता. त्याला चाप लावण्याचा प्रयत्न ट्रम्प प्रशासन करत आहे. त्या पार्श्वभूमीवरच ख्वाजा आसिफ यांनी हे वक्तव्य केलं होतं.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादterroristदहशतवादी