शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

डोनाल्ड ट्रम्प कॅनडाला घाबरले? शुल्कवाढीबाबत घेतलेला 'तो' निर्णय मागे घ्यावा लागला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:05 IST

US-Canada: अमेरिका आणि कॅनडाचे संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे.

US-Canada:अमेरिका आणि कॅनडाचे संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. अशातच, अमेरिकेला एक मोठा झटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेत परतल्यानंतर निवडणुकीतील आश्वासनांची झपाट्याने अंमलबजावणी सुरू केली आहे. परंतु आता कॅनडाच्या बाबतीत अमेरिका मवाळ होताना दिसत आहे. कॅनडाच्या भूमिकेमुळे अमेरिकेला यू-टर्न घ्यावा लागला आहे.

ट्रम्प प्रशासनाचा यू-टर्न मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरिष्ठ आर्थिक सल्लागाराने सांगितले की, कॅनडातून आयात होणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियमवरील शुल्क दुप्पट करुन 50 टक्के करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. पण, आता ट्रम्प सरकारने हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण म्हणजे, दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे बाजारात गोंधळाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे.

सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत पीटर नवारो म्हणाले, वाढलेले यूएस टॅरिफ तुर्तास लागू केले जाणार नाहीत. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या निर्णयानंतर कॅनडाच्या ओंटारियो प्रांताचे मंत्री डग फोर्ड यांनी अमेरिकेच्या वीज निर्णयातीवर लादलेले ज्यादा शुल्क तात्पुरते रोखले आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेनेही आपला ज्यादा शुल्क लादण्याचा निर्णय मागे घेतला आहे. तज्ञांचे असे मत आहे की, जर कॅनडाने शुल्क चालू ठेवले, तर अमेरिका हे व्यापार युद्ध जास्त काळ चालू ठेवू शकणार नाही. त्यामुळेच अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प सरकारला फटकाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काचा उलटा परिणाम होताना दिसत आहे. चीन आणि कॅनडाने प्रत्युत्तरात शुल्क लादले आहे. यामुळे अमेरिकन बाजारात सातत्याने घसरण नोंदवण्यात येत आहे. 

कॅनडाच्या नव्या पंतप्रधानांचा निशाणा कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत कठोर भूमिका दाखवली आहे. कॅनडाच्या वस्तूंवर शुल्क लादण्याच्या आणि कॅनडाला 'अमेरिकेचे 51 वे राज्य' बनवण्याच्या ट्रम्प यांच्या धमक्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. कार्ने म्हणाले, आमची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आमची उत्पादने, व्यापार आणि जीवनशैलीवर अन्यायकारक शुल्क लादले आहे. हा कॅनेडियन कुटुंबांवर, कामगारांवर आणि व्यवसायांवर हल्ला आहे. पण आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाCanadaकॅनडाInvestmentगुंतवणूकbusinessव्यवसाय