शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

एलन मस्कसह अमेरिकेचे उद्योगपती दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; काय आहे सीक्रेट प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:39 IST

ओपन सोर्स जिहाद हा शब्द जुलै २०१० मध्ये पहिल्यांदा अल मालाहेमद्वारे त्यांच्या इंग्रजी पत्रिकेत आढळला होता

इस्रायल-हमास युद्धावर अमेरिकेच्या भूमिकेवरून अल-कायदा या दहशतवादी संघटनेने उद्योजक एलोन मस्क, बिल गेट्स आणि सत्या नाडेला यांची हत्या करण्याची आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनं अल-कायदाशी संबंधित चॅटरूम्सच्या मेसेजचा रिव्यू केला. ज्यामध्ये दहशतवादी संघटनेने आपल्या समर्थकांना अमेरिका, ब्रिटन आणि फ्रेंच कंपन्यांद्वारे चालवल्या जाणार्‍या फ्लाइटवर हल्ला करण्याचे आवाहन केले आहे. या यादीत अमेरिकन एअरलाइन्स, कॉन्टिनेंटल, डेल्टा, ब्रिटिश एअरवेज, एअर फ्रान्स आणि एअर फ्रान्स-केएलएम यांचा समावेश आहे.

अल कायदाची मीडिया शाखा अल मालाहेम यांनी म्हटलंय की, अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांनी इस्त्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्याचे समर्थन केल्यामुळे ते टार्गेटवर आले आहेत. गाझा येथील हल्ल्यात २० हजाराहून लोकांचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे फिलिस्तीनच्या समर्थनासाठी ओपन सोर्स जिहाद यांच्याकडे आवाहन केले आहे. जागतिक स्तरावर महत्त्वाकांक्षी मुजाहिद्दीनला खाद्य सामानाचा वापर करून एडवांस्ड बॉम्ब बनवण्यासाठी सूचना केली आहे. 

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर एलन मस्क, बिल गेट्स आणि माजी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अध्यक्ष बेन बर्नानके आहेत. बेन बर्नानके एक यहूदी आहेत आणि त्यांचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर चांगला प्रभाव आहे. या व्हिडिओत माइक्रोसॉफ्टचे बिल गेट्सच्या कार्यकाळातील जुने भाषण दाखवले. त्यात भारतीय मूळ असलेले सत्या नडेला आणि माजी सीईओ स्टीव बाल्मर यांनाही टार्गेट करण्याचं आवाहन केले आहे. हा व्हिडिओ अल कायदाकडून ३१ डिसेंबरला जारी केला होता. अल कायदाचा ओपन सोर्स जिहाद अभियान हा विद्रोही साहित्याच्या माध्यमातून मुस्लीमांना आकर्षिक करून त्यांना स्फोटकं बनवण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग दिले जाते. त्याचसोबत सुसाईड बॉम्बर म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. 

ओपन सोर्स जिहाद हा शब्द जुलै २०१० मध्ये पहिल्यांदा अल मालाहेमद्वारे त्यांच्या इंग्रजी पत्रिकेत आढळला होता. या व्हिडिओत इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेनसह जागतिक नेत्यांसोबत भेट घेताना दाखवले आहे. त्याचसोबत पाश्चिमात्य देशांवर इस्लामविरोधात युद्धात हातमिळवणी केल्याचा आरोप आहे. अल कायदाने व्हिडिओ आत्मघातकी हल्लेखोर हसन अल असीरीचं उदाहरण दिले आहे. ज्यानं सौदी अरबचे उपमंत्री मोहम्मद बिन नायेफ यांना टार्गेट केले होते. त्यात डेल्टा विमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा अल फारुख याच्याबद्दलही बोलले गेले. 

टॅग्स :terroristदहशतवादीIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धAmericaअमेरिका