शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:38 IST

US Attack On Iran Nuclear Site: अमेरिकेने तीन प्रमुख अणुकेंद्रांना लक्ष्य केल्यानंतर इराणने आज इस्राइलमधील विविध शहरांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत. आता इराणचे हे हल्ले केवळ इस्राइलपुरतेच मर्यादित राहणार की अमेरिकेलाही इराण लक्ष्य करणार याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

अमेरिकेने रात्री इराणमधील तीन प्रमुख अणुकेंद्रांवर जोरदार हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्राइलच्या अणुकार्यक्रमाची जबर हानी झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. तर या हल्ल्यात किरकोळ नुकसान झाल्याचे इराणने म्हटले आहे. मात्र या हल्ल्यामुळे इराणला जबर धक्का बसला असून, आता इराण या हल्ल्याचा बदला कसा घेऊ शकतो, याबाबत संरक्षण क्षेत्रामधून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, इराणने आज इस्राइलमधील विविध शहरांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत. आता इराणचे हे हल्ले केवळ इस्राइलपुरतेच मर्यादित राहणार की अमेरिकेलाही इराण लक्ष्य करणार याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांनी सांगितले की, आज सकाळी जे काही घडले ते अत्यंत खतरनाक आहे, तसेच गुन्हेगारी कृत्य आहे. याचा परिणाम कायम राहणार आहे. तसेच त्यासाठी जगातील प्रत्येक देशाने चिंता केली पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याप्रमाणे आम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. आम्ही आमचे नागरिक आणि देशाच्या  सार्वभौमत्वासाठी आणि त्याच्या हितांच्या रक्षणासाठी प्रत्येक पर्यायाची निवड करू.

दरम्यान, इराणमधील अणुकेंद्रांवर अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराण मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या हवाई तळांना लक्ष्य करू शकतो, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या युद्धामध्ये अमेरिका सहभागी झाल्याने मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेचे हवाई तळ इराणचे प्राथमित लक्ष्य असू शकतात, असा संरक्षण तज्ज्ञांचा अंदाज आहे. मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेचे अनेक हवाई तळ आहेत. त्या माध्यमातून अमेरिका या भागावर आपलं वर्चस्व ठेवून आहे.

त्याबरोबरच इराण लेबेनॉनमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुती, गाझा पट्टीमधील हमास आदी आपल्या समर्थित गटांच्या माध्यमातून अमेरिका आणि इस्राइलवर हल्ले करू शकतो, असाही दावा केला जात आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखीनच वाढू शकतो.

त्याशिवाय इराणकडून रणनीतिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वपूर्ण होर्मुझच्या आखातामध्ये नाविक कारवाई करून नाकेबंदी केली जाऊ शकते. त्यामुळे येथून होणारी मालवाहतूक अडचणीत येऊ शकते. होर्मुझच्या आखातामधून जगातील एकूण तेलवाहतुकीपैकी २० टक्के तेलाची वाहतूक होते.  

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलUnited Statesअमेरिका