शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन आर्मीचा पाकिस्तानला दणका, फायरिंगमध्ये १० जणांचा मृत्यू; दूतावासावरील हल्ल्याचा बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:23 IST

अमेरिकन दूतावासाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केले आहेत. हा आदेश इस्लामाबाद दूतावासासोबत लाहोर आणि कराची इथल्या दूतावासावरही लागू आहे

इस्लामाबाद - इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात आक्रोश पसरला. संतापलेल्या लोकांनी कराची येथील अमेरिकेच्या दूतावास कार्यालयाला टार्गेट केले. या हल्ल्याविषयी नवीन माहिती समोर आली आहे. रविवारी अमेरिकन दूतावास कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. ज्यात कमीत कमी १० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा गोळीबार पाकिस्तानी पोलिसांकडून नव्हे तर अमेरिकन लष्कराने केला होता. त्याशिवाय अमेरिकेने पाकिस्तानला दणका देत सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केली आहेत.

माहितीनुसार, अमेरिकन दूतावास कार्यालय परिसरात एखाद्या लष्कराने गोळीबार करण्याची दुर्लभ घटना मानली जाते. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात लोकांनी आक्रमक होत दूतावास कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिथल्या सुरक्षा जवानांनी गोळीबार केला. आता हा गोळीबार पाकिस्तानी पोलिसांनी केला की अमेरिकन आर्मीने केला याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत गोळीबार आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्याचे दिसते. काही व्हिडिओत एक आंदोलनकारी दूतावासाच्या दिशेने शस्त्र दाखवताना दिसतो. पाकिस्तानात इराणच्या समर्थनार्थ अनेक शहरात लोक रस्त्यावर आले आहेत. देशात कमीत कमी २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकारने मोठ्या जमावाला निर्बंध घातले आहेत. 

अमेरिकेने व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केल्या

अमेरिकन दूतावासाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केले आहेत. हा आदेश इस्लामाबाद दूतावासासोबत लाहोर आणि कराची इथल्या दूतावासावरही लागू आहे. येत्या ६ मार्चपर्यंत सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द करण्यात आल्या आहेत. कराची येथे अमेरिकन दूतावासाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आलेत. लाहोर आणि इस्लामाबाद येथेही अमेरिकन कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तान हा जगातील दुसरा सर्वात मोठा शिया समुदाय असलेला देश आहे. त्यामुळे इराणमधील घटनेचे पडसाद पाकिस्तानात वेगाने उमटले. जर पाकिस्तानातील ही परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांत बिघाड होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :IranइराणPakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाIsraelइस्रायलAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई