अमेरिकेच्या राजदूताची निवड 2 डिसेंबरला
By Admin | Updated: November 27, 2014 02:36 IST2014-11-27T02:36:29+5:302014-11-27T02:36:29+5:30
भारतात अमेरिकेच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यांसंदर्भात अंतिम सुनावणी सिनेटच्या प्रमुख समितीने 2 डिसेंबर रोजी निश्चित केली आहे.

अमेरिकेच्या राजदूताची निवड 2 डिसेंबरला
वॉशिंग्टन : भारतात अमेरिकेच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यांसंदर्भात अंतिम सुनावणी सिनेटच्या प्रमुख समितीने 2 डिसेंबर रोजी निश्चित केली आहे. राजदूतपदासाठी रिचर्ड वर्मा (45) यांना पसंती मिळाली तर नवी दिल्लीत अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकारीपदी नियुक्त होणारे ते पहिले भारतीय अमेरिकन असतील. यापूर्वी या पदावर नॅन्सी पॉवेल होत्या त्यांनी यावर्षीच्या सुरुवातीला राजीनामा दिला होता.
सध्या कॅथलिन स्टीफन्स या भारतातील अमेरिकेच्या दूतावास प्रमुख आहेत. भारताच्या येत्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणो म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी अमेरिकेच्या राजदूतपदाची नियुक्ती होईल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रथमच भारतात प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणो म्हणून उपस्थित राहत आहेत. ओबामा दोनवेळा भारत दौरा करणारेही पहिलेच राष्ट्रपती असतील. ओबामा यांचा हा दौरा ऐतिहासिक समजला जात असून त्यापूर्वी रिचर्ड वर्मा यांच्या नियुक्तीचा निर्णय होईल, अशी आशा प्रशासकीय अधिका:यांनी व्यक्त केली.
रिपब्लिकन सदस्यांकडून आणल्या जात असलेल्या अडथळ्य़ांमुळे सिनेटकडे राजदूतपदाशी संबंधित 55 शिफारशी प्रलंबित आहेत. नियुक्त्या होत नसल्यामुळे जागतिक पातळीवर अमेरिकेच्या डावपेचांवर परिणाम होत असल्याचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सिनेटसमोर म्हटले होते.