तोपर्यंत अफगाण सरकारशी चर्चा नाही-मुल्ला मन्सूर
By Admin | Updated: September 22, 2015 22:23 IST2015-09-22T22:23:28+5:302015-09-22T22:23:28+5:30
विदेशी सैनिकांना देशाबाहेर काढण्यासह अमेरिकेसोबतचा सुरक्षा करार रद्द केल्यास आपण सरकारशी चर्चा करू शकतो, असे अफगाण तालिबानचा नवा नेता मुल्ला मन्सूरने म्हटले आहे

तोपर्यंत अफगाण सरकारशी चर्चा नाही-मुल्ला मन्सूर
काबूल : विदेशी सैनिकांना देशाबाहेर काढण्यासह अमेरिकेसोबतचा सुरक्षा करार रद्द केल्यास आपण सरकारशी चर्चा करू शकतो, असे अफगाण तालिबानचा नवा नेता मुल्ला मन्सूरने म्हटले आहे.
बकरी ईद सणापूर्वी दिलेल्या संदेशात मुल्ला मन्सूरने तालिबानला एकजूट राहण्याचेही आवाहन केले. तालिबानने १५ सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या केल्यानंतर मन्सूरचे हे वक्तव्य आले आहे. देश बाह्य शक्तींच्या ताब्यात नसल्यास समस्या आपसात चर्चा करून सोडवता येऊ शकतात, असे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)
देशात शांतता प्रस्थापित करायची असल्यास सरकारने परदेशी सैन्याला देशाबाहेर काढून आक्रमण करणाऱ्यांसोबतचे सर्व लष्करी व सुरक्षा संबंध तोडावेत, असेही तो म्हणाला. जोपर्यंत सरकार या अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्याच्याशी चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्याने म्हटले.