अमेरिका: टाइम्स स्क्वेअरजवळील गर्दीत घुसली कार, 1 ठार तर 13 जखमी
By Admin | Updated: May 18, 2017 22:52 IST2017-05-18T22:52:03+5:302017-05-18T22:52:03+5:30
अमेरिकेच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळील लोकांच्या गर्दीत अचानक एक कार घुसल्याचं वृत्त आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी

अमेरिका: टाइम्स स्क्वेअरजवळील गर्दीत घुसली कार, 1 ठार तर 13 जखमी
ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 18 - अमेरिकेच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळील लोकांच्या गर्दीत अचानक एक कार घुसल्याचं वृत्त आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपाघत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. चालकाने मद्यप्राशन केलं होतं की नाही यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
सुरक्षा कडे तोडून फुटपाथवरून चालणा-या लोकांच्या दिशेने भरधाव वेगात कार आली. काही समजण्याच्या आत पादचाऱ्यांना जोरदार धडक बसली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून अन्य 13 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत माहिती देण्यात आली असून अपघातस्थळापासून ट्रम्प टॉवर अगदी जवळ आहे.