शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

UAE चे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 18:05 IST

Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan : राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान 73 वर्षांचे होते आणि ते अनेक दिवसांपासून आजारी होते.

संयुक्त अरब अमीरातचे (UAE) राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान (Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan) यांचे निधन झाले आहे. यूएईमधील सरकारी वृत्तसंस्था WAM ने याला दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान 73 वर्षांचे होते आणि ते अनेक दिवसांपासून आजारी होते. राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनानंतर सरकारने 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. याशिवाय, देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवस सुट्टी असेल. दुबई मीडिया ऑफिसद्वारे राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्याची माहिती देण्यात आली आहे.  

शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी 3 नोव्हेंबर 2004 पासून देशाचे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याआधी त्यांचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान राष्ट्रपती होते. 1971 ते नोव्हेंबर 2004 पर्यंत ते देशाचे प्रमुख होते. 1948 मध्ये जन्मलेले शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान हे यूएईचे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे 16 वे शासक होते. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी आपल्या कार्यकाळात यूएई आणि अबू धाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक सुधारणा अंमलात आणल्या. त्यांच्या कार्यकाळातच यूएईचा एवढा विकास झाला की, इतर देशांतील लोकही याठिकाणी मोठ्या संख्येने पोहोचले.

दरम्यान, शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी युएईला वायू आणि तेल क्षेत्रात प्रगती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय इतर उद्योगही त्यांच्या कारकीर्दीत विकसित झाले. विशेषतः यूएईच्या उत्तरेकडील प्रदेशांच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, जे इतर भागांच्या तुलनेत किंचित मागासलेले होते. या परिसारात त्यांनी गृहनिर्माण, शिक्षण आणि सामाजिक सेवांचा प्रसार करण्याचे काम केले. त्यांनी यूएईमधील फेडरल नॅशनल कौन्सिलच्या सदस्यांची थेट निवडणूक देखील सुरू केली होती.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती