शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
4
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
5
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
6
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
7
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
8
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
9
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
10
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
11
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
12
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
13
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
14
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
15
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
16
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
17
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
18
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
19
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
20
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार

अनोखी प्रेमकहाणीः घटस्फोटाच्या 50 वर्षांनंतर हे जोडपं पुन्हा करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 17:02 IST

अमेरिकेत केंटकी इथे राहणा-या 83 वर्षीय हेरॉल्ड हॉलंड हे पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. विशेष म्हणजे ते दुस-या तिस-या कोणी नव्हे, तर घटस्फोट दिलेली स्वतःची पहिली पत्नी राहिलेल्या लिलियन बार्न्सशीच लग्न करणार आहे.

केंटकी- अमेरिकेत केंटकी इथे राहणा-या 83 वर्षीय हेरॉल्ड हॉलंड हे पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. विशेष म्हणजे ते दुस-या तिस-या कोणी नव्हे, तर घटस्फोट दिलेली स्वतःची पहिली पत्नी राहिलेल्या लिलियन बार्न्सशीच लग्न करणार आहे. या जोडप्यानं 50 वर्षांपूर्वीच घटस्फोट घेतला होता. आता या महिन्याच्या अखेरीस ते दोघे लग्न करणार आहेत.50 वर्षांपूर्वी ख्रिसमसच्या दरम्यान त्यांनी लग्न केलं होतं. दोघांनाही घटस्फोटाच्या आधीच पाच मुलं झाली होती. परंतु 1968ला दोघंही एकमेकांपासून विभक्त झाले. हॉलंड म्हणाले, माझ्या कामामुळे मी माझ्या कुटुंबीयांपासून लांब राहिलो होतो. त्यामुळेच आमचा घटस्फोट झाला होता. त्यात पूर्णतः माझी चूक होती.दरम्यान, कालांतरानं या दोघांनी दुसरं लग्न केलं. परंतु दोघांचेही जोडीदार 2015ला त्यांची साथ सोडून स्वर्गवासी झाले. त्यानंतर हॉलंड आणि बार्न्स हे एक-दुस-यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहिले. तसेच मी बार्न्सला तिची इच्छा असेल तिकडे घेऊन जाईन, असंही एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं. हे जोडपं 14 एप्रिलला पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहे. 

टॅग्स :marriageलग्न