शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:03 IST

Piyush Goyal On Air India Plane Crash Incident: लंडनमध्ये असलेल्या पीयूष गोयल यांनी एअर इंडिया विमान अपघाताबाबत भाष्य केले.

Piyush Goyal On Air India Plane Crash Incident: १२ जून २०२५ रोजी दुपारी सुमारे दीड वाजता अहमदाबाद ते लंडन या दरम्यान जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथील धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यावर अवघ्या ४० ते ५० सेकंदात विमान कोसळले आणि त्या विमानात प्रवास करत असलेल्या २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला. परंतु, एक व्यक्ती अतिशय आश्चर्यकारकपणे या भीषण विमान अपघातातून थोडक्यात बचावली. या घटनेमुळे संपूर्ण भारतवासीयांचे मन अतिशय सुन्न झाले. जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे एक विधान चर्चेत आले आहे. 

प्रचंड भीषण विमान अपघातानंतर एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळले. या बोईंग ७८७-८ विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत अनेक संस्था माहिती घेण्याचे काम करत आहेत. या अपघाताबाबत अनेक दावेही केले जात आहे. 

‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत

पीयूष गोयल सध्या लंडन येथे आहेत. लंडनच्या क्वीन एलिझाबेथ द्वितीय सेंटर येथे इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमात बोलताना पीयूष गोयल यांनी एअर इंडिया विमान अपघाताबाबत भाष्य केले. हे खूप दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. हे ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ आहे. हा एक अपघात आहे, असे दिसते. अर्थात, चौकशी सुरू आहे, परंतु भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्यासाठी हे जगाला जागे करणारे संकेत आहेत, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, या भयंकर अपघातातून एकमेव प्रवासी ४५ वर्षीय विश्वास कुमार रमेश हे वाचले आहेत. ते आपत्कालीन एक्झिटजवळील सीट ११ए वर बसले होते. याबाबत बोलताना विश्वास कुमार रमेश म्हणाले की, ते विमानात ज्या ठिकाणी बसले होते तो भाग इमारतीला धडकला नाही, ज्यामुळे जमिनीवर एक अरुंद रस्ता राहिला. त्यामुळे आपत्कालीन एक्झिटचा दरवाजा उघडून त्यांना विमानातून बाहेर पडता आले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाpiyush goyalपीयुष गोयल