शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

भाकरीच्या चंद्राला किंमत जगभरात वेगवेगळी, विचार करायला लावणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 11:08 IST

जगातील प्रगत देशांमध्ये लोकांना आपल्या उत्पन्नाचा अत्यंत लहानसा भाग रोजच्या जेवणावर खर्च करावा लागतो, गरीब देशांमध्ये मात्र हे प्रमाण अगदी उलट आहे.

न्यू यॉर्क -  जगाची वाढत चाललेली संख्या आणि पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेली धडपड आपल्याला नवी आहे. पण एकवेळच्या जेवणाच्या ताटाचे मूल्यही जगभरात अत्यंत असमान असल्याचेे पाहून तुम्हाला धक्का बसेल. जगातील प्रगत देशांमध्ये लोकांना आपल्या उत्पन्नाचा अत्यंत लहानसा भाग रोजच्या जेवणावर खर्च करावा लागतो, गरीब देशांमध्ये मात्र हे प्रमाण अगदी उलट आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या संशोधकांनी दिलेल्या अहवालातून ही असामनता आणि अविकसित देशांची स्थिती समोर आली आहे. जगभरातील विविध देशांतील लोकांचे उत्पन्न आणि त्यांचा रोजच्या खाण्यावर होणारा खर्च या दोन मुद्द्यांचा या अहवालात विचार करण्यात आला आहे.

अमेरिकेत न्यू यॉर्कमध्ये राहाणारी व्यक्ती आपल्या उत्पन्नातील केवळ 0.6% (1.20$) रक्कम रोजच्या जेवणावर खर्च करते , 600 किलोकॅलरीसाठी लागणा-या खाण्याच्या वस्तू त्या रकमेत सहज येऊ शकतात. इतक्या पोषणमूल्यासाठी भारतीय व्यक्तीला मात्र आपल्या उत्पन्नाच्या ४.५% इतका खर्च करावा लागतो किंवा त्यांच्या खाण्याचा खर्च 9.25 डॉलर्स इतका आहेे.

हे झालं अमेरिकेसारख्या विकसित आणि भारतासारख्या विकसनशील देशाचंं उदाहरण. मात्र आफ्रिकेतील देशांमध्ये यातुलनेत अत्यंत वाईट स्थिती आहे. या खंडातील गरीब देशांमधील लोकांचा बहुतांश खर्च केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी होतो तसेच केवळ पोट भरण्यासाठीच त्यांना काम करावे लागते. सुदानमधील व्यक्तीला रोजच्या उत्पन्नाच्या 155% खर्च जेवणावर करावा लागतो. याचा अर्थ दिवसभर काम करुनही येथील लोक अर्धपोटीच राहातात. तर अटलांटिक नहासागरातील हैती बेटांवरील नागरिकांना जेवणासाठी रोजच्या उत्पन्नातील 35 % वाटा बाजूला काढावा लागतो. दक्षिण सुदानमधील नागरिकांचे भाग्य नव्या स्वायत्त देशाच्या निर्मितीनंतरही बदललेले नाही. उत्तम पिकाऊ जमीन, खाणकाम असे उद्योग शक्य असले तरी वारंवार येणारे पूर, पायाभूत सुविधांचा अभाव, अंतर्गत अशांतता यामुळे त्याचा काहीच फायदा नागरिकांना होत नाही. दक्षिण सुदानमधील नागरिकाला जेवणासाठी 321.70  डॉलर्स इतका खर्च करावा लागत.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य