मुंबई हल्ल्यात माझा सहभाग सिद्ध करणं अशक्य - हाफीज सईद
By Admin | Updated: December 14, 2015 13:51 IST2015-12-13T21:50:05+5:302015-12-14T13:51:36+5:30
मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माझा हात होता हे सिद्धं करणं भारतासाठी अशक्य आहे अशी दर्पोक्ती लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदने केली.

मुंबई हल्ल्यात माझा सहभाग सिद्ध करणं अशक्य - हाफीज सईद
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माझा हात होता हे सिद्धं करणं भारतासाठी अशक्य आहे अशी दर्पोक्ती लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदने केली. सईदने सोशल नेटवर्किंगवरून शेअर केलेल्या एका व्हिडीओतून भारताविरोधात गरळ ओकली आहे. मुंबई हल्ल्याला साच वर्ष उलटून गेल्यानंतरही हा हल्ला कोणी केला हे भारताला सिद्ध करता आलेले नाही व ते कधीच सिद्ध करू शकणारही नाहीत असेही सईदने म्हटले आहे.
या व्हिडीओमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना हाफिज सईदने आव्हान दिले आहे, 'सात वर्षांत तुम्ही मुंबईवर हल्ला कोणी केला याचे ठोस पुरावे देऊ शकला नाहीत, आणि अखेरपर्यंत ते सिद्धही करता येणार नाही' असे त्याने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नुकत्याच पाकिस्तानच्या दौ-यावर जाऊन गेल्या होत्या.
यापूर्वीही सईदने अशा अनेक दर्पोक्ती केल्या असून पॅरिमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीवरही सईदने टीका करत शरीफ यांनी मोदींची भेट घ्यायला नको होती असे म्हटले होते.