शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

युक्रेनची मोठी कारवाई, रशियावर केला एअर स्ट्राईक; उद्ध्वस्त केली ४१ लढाऊ विमाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:09 IST

रशियात ४,००० किमी आत कंटेनरमधून नेले ड्रोन; पाच हवाई तळांवर हल्ला; रशियाच्या ४७२ ड्रोन हल्ल्याला चोख प्रत्युत्तर

कीव/मॉस्को: रशियामध्ये ४ हजार किमी आत घुसून युक्रेनने ड्रोनद्वारे केलेल्या तुफान हल्ल्यात रशियाची ४१ अत्याधुनिक लढाऊ विमाने उद्ध्वस्त झाली आहेत, असा दावा युक्रेनच्या एका संरक्षण अधिकाऱ्याने केला. या हल्ल्यासाठी तब्बल दीड वर्षे तयारी सुरू होती आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लदिमिर झेलेन्स्की यांनी स्वतः या मोहिमेवर देखरेख ठेवली होती. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने देखील या हल्ल्याची पुष्टी केली असून, इरकुत्स्क, मर्मान्स्क, अमूर, इव्हानोव्हो आणि रझान या पाच वेगवेगळ्या भागांतील हवाईतळांवर हल्ले झाल्याचे म्हटले आहे.

रशियानेही तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात रविवारी युक्रेनवर आजवरचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला आहे. एकाच वेळी ४७२ ड्रोनने रशियाने हल्ला केला. सात क्षेपणास्त्रेही डागण्यात आली. या हल्ल्यांत युक्रेनचे १२ सैनिक मारले गेले. सांगण्यात येते. सोमवारी इस्तंबूलमध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यात थेट शांतता चर्चा सुरू होणार असून, त्याआधीच हा हल्ला झाला आहे.

रशियाने केलेले दावे...

  • एक हजार किमी दूरचे लक्ष्य भेदले: युक्रेनचे लष्करी प्रशिक्षण केंद्र युद्ध आघाडीच्या क्षेत्रापासून सुमारे १ हजार किमी अंतरावर आहे. तरीही रशियाने हे लक्ष्य भेदले. रशियाचे टेहळणी करणारे व हल्ल्याची क्षमता असलेले ड्रोन रात्री १च्या सुमारास इथपर्यंत पोहोचले आणि हा हल्ला झाला.
  • सैनिकांना शोधून हल्ले : युक्रेनच्या लष्करात अगोदरच सैनिकांची संख्या कमी होत चालली असून, युक्रेनने आता वेगवेगळ्या ठिकाणी या तुकड्या ठेवल्या आहेत. तरीही रशियाचे ड्रोन ही ठिकाणे शोधून हल्ले करीत आहेत. युक्रेनच्या ओलेक्सीवका गावावर ताबा मिळवला असल्याचा दावाही रशियाने केला.
  • लष्करी कमांडरने पद सोडले: लष्करी प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर लष्करी कमांडर मिखायलो ड्रापाती यांनी राजीनामा दिला. त्यांच्या नेतृत्वात युक्रेनने पूर्व सीमेवर जमीन परत मिळवली होती.

युक्रेनने केलेले दावे...

  • चार हजार किमी दूरवरील लक्ष्यभेद : कंटेनरमध्ये लपवून ट्रकमधून ड्रोन रशियाच्या आतील भागात नेण्यात आले होते. त्यावरुन हे हल्ले करण्यात आले. रशियाचा बेलाया हवाई तळ युक्रेनच्या सीमेपासून सुमारे ४ हजार किमी अंतरावर तर ओलेन्या हवाई तळ १,८०० किमी अंतरावर आहे. तरीही हे लक्ष्यभेद केल्याचे युक्रेनने म्हटले. यात रशियाचे १७ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
  • महागडी विमाने नष्ट : युक्रेनच्या एसबीयूने म्हटले की, त्यांचे ड्रोन रशियाच्या आत उडाले. टीयू-२५, टीयू-२२ सारख्या मोठ्या बॉम्बर्स व ए-५० ही महागडी हेर विमाने नष्ट केली. ए-५० विमाने खूपच दुर्मिळ आहेत व रशियाकडे फक्त १० आहेत. एक विमान सुमारे ३००० कोटी रुपयांचे आहे.
  • ओलेन्या एअरबेसवर आग : रशियाच्या इर्कुत्स्क भागातील 'बेलाया' एअरबेसला लक्ष्य करण्यात आले. 'ओलेन्या' एअरबेसवर हल्ला करण्यात आला.

रशियात स्फोट; सात ठार, दोन पूल उद्ध्वस्त

मॉस्को: शनिवारी रात्री उशिरा रशियातील भीषण स्फोटांत दोन पूल उद्ध्वस्त झाले. यामुळे दोन रेल्वे घसरून ७ जणांचा मृत्यू झाला. युक्रेन सीमेलगत ब्रायन्स्क भागात असलेला पूल स्फोटामुळे एका प्रवासी रेल्वेवर कोसळला. अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, काही तासांनंतर युक्रेन सीमेलगत कुर्क भागात दूसरा पूल स्फोटाने कोसळला.

रसद पुरवणारी रेल्वे उडवली : केनास्या सैनिकांना भोजन व इंधन घेऊन जाणारी एक मालगाडी स्फोटात उडवण्यात आली. या स्फोटात एक पूल उद्ध्वस्त झाल्याने रशियाच्या ताब्यातील जापोरिज्जिया आणि क्रिमियालगत मास्कोचा भाग यातील संपर्क तुटला. २०१४ मध्ये रशियाने क्रिमियावर ताबा मिळवला होता.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध