अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमिर झेलेन्स्की यांची बैठक पार पडली आहे. उभय नेत्यांच्या चर्चेनंतर, युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासाठीचा शांतता करार आता अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत. बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना पुतीन यांच्यासोबत झालेल्या फोन कॉलचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, बैठक सकारात्मक झाली. आपण कराराच्या अत्यंत जवळ आहोत.
ट्रम्प म्हणाले, शांतता करारासंदर्भातील काम जवळपास ९५% पूर्ण झाले आहे. मात्र, पूर्व डोनबास प्रदेशाचे भविष्य यासारखे एक-दोन मोठे मुद्दे अद्याप सुटलेले नाहीत. दरम्यान, ट्रम्प यांनी या करारासंदर्भात समाधान व्यक्त केले आहे. मात्र, असे असले तरी, पत्रकार परिषद कुठल्याही औपचारिक घोषणेशिवाय पार पडली. मात्र दोन्हीनेत्यांनी चर्चा निर्णायक वळणावर असल्याचे संकेत दिले आहेत.
२०-सूत्रीय शांतता योजना दरम्यान, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी चर्चेसंदर्भात अमेरिकेचे आभार मानले. तसेच, प्रस्तावित २०-सूत्रीय शांतता आराखड्यावर ९०% सहमती झाली असल्याचे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिका-युक्रेन 'सुरक्षा गॅरंटी' निश्चित झाली आहे. कायमस्वरूपी शांततेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
झेलेन्स्की पुढे म्हणाले, उर्वरित तांत्रिक मुद्द्यांवर युक्रेन आणि युरोपीय शिष्टमंडळ काम करत असून, आगामी काही आठवड्यांत यावर अंतिम निर्णय होईल. जानेवारी महिन्यात वॉशिंग्टनमध्ये यासंदर्भात पुढील महत्त्वाची चर्चा होईल, अशी आशा आहे.
दरम्यान, अद्याप, पूर्व यूक्रेन, विशेषतः डोनबास मुद्द्यावर सहमती झालेली नाही. या भागात फ्री ट्रेड झोन तयार करण्यासंदर्भात काही चर्चा झाली का? यावर ट्रम्प म्हणाले, हा मुद्दा अद्यापही सुटू शकलेला नाही.
Web Summary : Ukraine-Russia peace deal nears completion after Trump-Zelensky meeting. 95% agreed, but Donbas future unresolved. 20-point plan sees progress; security guarantees discussed. Final decision expected soon.
Web Summary : ट्रम्प-ज़ेलेंस्की मुलाकात के बाद यूक्रेन-रूस शांति समझौता करीब। 95% सहमति, लेकिन डोनबास का भविष्य अनसुलझा। 20-सूत्रीय योजना में प्रगति; सुरक्षा गारंटी पर चर्चा। जल्द ही अंतिम निर्णय अपेक्षित।