युक्रेनचा गॅस पुरवठा रशियाकडून खंडित
By Admin | Updated: June 16, 2014 23:57 IST2014-06-16T23:57:16+5:302014-06-16T23:57:16+5:30
गॅसची किंमत आणि थकबाकीबाबत युक्रेनसोबत करार न झाल्याने रशियाने त्याचा गॅस पुरवठा बंद केला आहे. यामुळे शीतयुद्धानंतरचे सर्वात भयंकर पूर्व-पश्चिम संकट आणखी चिघळण्याची भीती आहे.

युक्रेनचा गॅस पुरवठा रशियाकडून खंडित
किव : गॅसची किंमत आणि थकबाकीबाबत युक्रेनसोबत करार न झाल्याने रशियाने त्याचा गॅस पुरवठा बंद केला आहे. यामुळे शीतयुद्धानंतरचे सर्वात भयंकर पूर्व-पश्चिम संकट आणखी चिघळण्याची भीती आहे.
युक्रेनमधील पाश्चात्त्य समर्थक नव्या नेत्यांनी वीज संकटाशी संबंधित समस्या डोळ््यासमोर ठेवून बोलणीचे यजमानपद भूषवले होते. युरोपियन संघ प्रायोजित ही चर्चा रात्रभर सुरू होती. मात्र, यात दोन्ही पक्षांदरम्यान किंमत आणि किववरील रशियन कर्जाच्या रकमेवरील असहमती दूर होऊ शकली नाही, असे रशियाची सरकारी गॅस कंपनी गॅजप्रोमने वृत्तसंस्थेला सांगितले.
(वृत्तसंस्था)