शहरं
Join us  
Trending Stories
1
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
2
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
3
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
4
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
5
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
6
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
7
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
8
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
9
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
10
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
11
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
12
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस
13
Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स
14
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
15
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
16
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
17
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
18
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
19
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
20
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल

प्लास्टर, स्पंज, लाकूड... हा आहे तिचा खाऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 8:38 AM

विंटरला चाॅकलेट-लाॅलीपाॅप-केक-पेस्ट्री नाही तर ‘घर खायला’ आवडतं! भिंतींचे प्लास्टर, सोफ्याच्या फोममधला स्पंज, फोटो फ्रेमच्या लाकडी चौकटी, काचा हे तिचे आवडते पदार्थ आहेत.

लहान मुलांना खायला काय द्यायचं, हा जगातल्या कोणत्याही आईसाठी मोठा अवघड विषय असतो. आपल्या मुलांनी खायला हवं यासाठी स्वयंपाकघरात चवीचे नाना प्रयोग करणाऱ्या आया जगभरात सापडतील. पण ब्रिटनमधील वेल्स येथील  ब्लॅकवूड शहरात राहणारी  स्टेसी एहेर्न ही २५ वर्षांची महिला मात्र याला अपवाद ठरावी. कारण ती आपल्या  मुलीने ‘काही’ खाऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून तिच्यावर पहारा देत असते. स्टेसीला दोन मुली आहेत. एक मुलगी तीन वर्षांची तर दुसरी एक वर्षाची आहे. विंटर ही स्टेसीची मोठी मुलगी असून तिच्या खाण्याच्या अजब सवयीमुळे स्टेसीला दिवसरात्र तिच्यावर नजर ठेवावी लागते. विंटरला चाॅकलेट-लाॅलीपाॅप-केक-पेस्ट्री नाही तर ‘घर खायला’ आवडतं! भिंतींचे प्लास्टर, सोफ्याच्या फोममधला स्पंज, फोटो फ्रेमच्या लाकडी चौकटी, काचा हे तिचे आवडते पदार्थ आहेत.

ही मुलगी अख्खं घर खाऊन जाईल की काय असं स्टेसीला वाटू लागलं आहे. स्टेसीने घरात नुकताच नवीन सोफा घेतला होता. त्या सोफ्याचा चावा घेऊन विंटरने तो फाडला, त्यातला फोम काढून ती खायला लागली. तीन वर्षांच्या विंटरने घरातल्या आठ फोटो फ्रेम्स फोडल्या. या फ्रेमच्या काचांचे तुकडे खाण्याचाही विंटरने प्रयत्न केला होता. पण स्टेसीचं तिच्याकडे बारीक लक्ष असल्याने अजूनपर्यंत तरी विंटरच्या पोटात काच जाऊ न देण्यात ती यशस्वी झाली आहे. इतर सर्वजण जे खातात ते पदार्थ विंटरला खायचे नसतात. जे घटक खाण्यासाठीचे नसतातच मुळी ते विंटरला फार आवडतात. हे असं का? हे शोधण्यासाठी स्टेसीने डाॅक्टरांची मदत घेतली तेव्हा तिला ‘पिका’ नावाची खाण्याची विकृती असल्याचे समजले.  

इतर सर्व मुलांप्रमाणेच विंटरचीही वाढ ‘नाॅर्मल’ म्हणावी अशीच होती. विंटरला तोंडात हात, बोट घालण्याची फार सवय होती. पण लहान  मुलं घालतातच तोंडात बोटं म्हणून स्टेसीने विंटरच्या या सवयीकडे फार गंभीरपणे पाहिलं नाही. पण विंटर एक वर्षाची झाल्यानंतर मात्र तिचं तोंडात हात घालणं, कोणतीही गोष्ट तोंडात टाकणं, सामान्य पौष्टिक खाणं नकोच म्हणणं हे फारच वाढू लागलं. विंटरला ‘पिका’ ही खाण्याची विकृती असल्याचं  निदान झालं तेव्हा विंटर १३ महिन्यांची होती. जानेवारी २०२४ मध्ये विंटरला स्वमग्नता (ऑटिझम) असल्याचंही निदान झालं. स्वमग्न असलेल्या बहुतांश मुलांना पिका ही खाण्याची विकृती असतेच असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.विंटरने नको त्या गोष्टी तोंडात घालू नये यासाठी स्टेसी तिला उंच खुर्चीवर बसवते. तिच्या हातात खाऊची वाटी देते. पण विंटर मात्र तो खाऊ बाजूला ठेवून देते आणि खुर्चीचे हात खाण्याचा प्रयत्न करते.

खाण्याच्या अशा विचित्र सवयीमुळे विंटरला रात्रीची झोपही नीट लागत नाही. मध्यरात्री उठून हाताला लागेल ती वस्तू खाण्यास सुरुवात करते. ज्यावर झोपते तो काॅट, अंगावर पांघरलेली गोधडी चावत बसते. खाण्याच्या या अजब सवयीतून विंटरला काही होऊ नये म्हणून स्टेसीला रात्रीची जागरणं करून तिच्याकडे लक्ष ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. घर खाऊ पाहणाऱ्या आपल्या मुलीकडे दिवसरात्र लक्ष ठेवावं लागत असल्याने स्टेसी हैराण झाली आहे, थकून गेली आहे. पण डाॅक्टरही यावर काहीच उपाय नसल्याचं सांगतात. तिला सेन्सरी प्ले म्हणजे स्पर्श, गंध, चव, दृष्टी, ऐकणं या संवेदनांना उत्तेजना देणारे खेळ खेळण्यास द्यावे एवढाच सल्ला ते देतात. स्वत: स्टेसीने विंटरला तिची अजब खाण्याची भूक सुरक्षितरीत्या भागवण्यासाठी तिच्यासाठी चावता येतील असे नेकलेस तयार केले आहेत. किमान हे चावत बसली तर तिचं इतर गोष्टींकडे लक्ष तरी जाणार नाही अशी स्टेसीला आशा आहे. आपली मुलगी या विकृतीतून लवकर बाहेर पडावी अशी स्टेसी प्रार्थना करते आहे, पण सध्या तरी विंटरकडे २४ तास लक्ष देण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नाही.

‘पिका’ म्हणजे नेमकं काय?‘पिका’ ही एक प्रकारची मानसिक स्थिती आहे. या स्थितीत पौष्टिक नसलेल्या आणि खाण्याचे पदार्थ नसलेल्या माती, सिमेंट, लाकूड, रंग, खडू यासारख्या वस्तू खाण्याचा मोह होतो. पिका विकृतीमुळे विषबाधा, रक्ताची कमतरता यासारख्या गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. स्वमग्नता हा आजार असलेल्या, मेंदूस इजा झालेल्यांमध्ये पिका ही खाण्याची विकृती मोठ्या प्रमाणात आढळून येते. गरोदर महिला, अपस्मार (एपिलेप्सी) या आजाराच्या रुग्णांमध्येही ही विकृती होण्याचा धोका असतो. त्या त्या व्यक्तीची स्थिती अणि गरज बघून वेगवेगळे उपचार केले जातात.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयWorld Trendingजगातील घडामोडी