शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
4
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
5
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
6
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
7
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
8
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
9
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
10
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
11
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
12
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
13
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
14
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
15
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
16
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
17
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
18
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
19
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
20
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

गुगल प्ले स्टोअरमधून यूसी ब्राउझर हटवले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 16:34 IST

मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे युसी ब्राउझर हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले आहे.

नवी दिल्ली - मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे युसी ब्राउझर हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले आहे. युझर्सचा डाटा गोळा करत असल्याचा आरोप झाल्याने वादात सापडलेल्या या अॅपची निर्मिती चीनमधील अलीबाबा ग्रुपने केली होती. सध्या गुगल प्ले स्टोअरमध्ये सर्च केल्यावर हे अॅप दिसत नाही. मात्र हे अॅप का हटवण्यात आले याचे नेमके कारण समोर आलेले नाही.भारतासह जगभरातील मोबाईल युझर्समध्ये हे अॅप खूप लोकप्रिय आहे. जगभरात या अॅपचे सुमारे 42 कोटी युझर्स आहेत. भारतात तर सुमारे 10 कोटी जण या अॅपचा वापर करतात. युसी ब्राउजर हे अॅप प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले असले तरी युसी ब्राऊझर मिनी आणि न्यू युसी ब्राऊझर हे अॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये कायम ठेवण्यात आले आहेत. पण युसी ब्राऊझरची मात्र प्ले स्टोअरमधून गच्छंती का करण्यात आली याचे कारण समोर आलेले नाही. असे असले तरी डाटा चोरीच्या आरोपामुळे युसी ब्राऊझरला गुगल प्ले स्टोअरमधून बाहेर काढल्याचा अंदाज आहे.  जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचं UC मोबाईल ब्राऊजर सरकारच्या रडारवर असून भारतीय ग्राहकांचा मोबाईल डाटा लीक केला जात असल्याचा संशय आहे. जर कंपनी भारतीय ग्राहकांची फसवणूक करत असल्याचं आढळल्यास बंदी घालण्यात येईल अशी माहिती माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील एका अधिका-याने दिली होती. ब्राऊजर ग्राहकांचं लोकेशन आणि डाटा रिमोट सर्व्हरमध्ये कसा पाठवतो, याची माहिती घेण्यासाठी सरकारने कंपनीची चौकशी सुरु केली होती. UC ब्राऊजरकडून युझर आणि मोबाईलची माहिती चीनमध्ये असलेल्या रिमोट सर्व्हरला पाठवली जाते असा संशय आहे. वायफायच्या माध्यमातून इंटरनेट वापरल्यास फोन आणि अक्सेस पॉईंटची माहितीही रिमोट सर्व्हरला पाठवली जाते, असं सुत्रांचं म्हणणं आहे.   'युसी ब्राऊजरविरोधात आम्हाला अनेक तक्रारी आल्या आहेत. भारतीय ग्राहकांचा मोबाईल डाटा चीनमधील सर्व्हरमध्ये पाठवला जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. काही तक्रारींनुसार, युजर्सने ब्राऊजर डिलीट केलं असता किंवा डाटा क्लिन केला असतानाही ब्राऊजर डिव्हाईसचा डिएनएस कंट्रोलमध्ये ठेवत आहे', अशी माहिती अधिका-याने आपलं नाव उघड न करण्याच्या अटीखाली दिली आहे. जर कंपनीवरील आरोप सिद्ध झाले तर देशात कायमची बंदी घालण्यात येईल असं अधिका-याने स्पष्ट केले होते. 

टॅग्स :googleगुगलnewsबातम्या