शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:17 IST

Sudan News: सुदानच्या हवाई दलाने दार्फुर येथील न्याला विमानातळावर उतरलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) विमानावर जबर हल्ला केला असून, या हल्ल्यात हे विमान पूर्णपणे नष्ट झाले आहे. तसेच या विमानातून प्रवास करत असलेल्या ४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

सुदानच्या हवाई दलाने दार्फुर येथील न्याला विमानातळावर उतरलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) विमानावर जबर हल्ला केला असून, या हल्ल्यात हे विमान पूर्णपणे नष्ट झाले आहे. तसेच या विमानातून प्रवास करत असलेल्या ४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुदानमधील सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार या विमानामध्ये कोलंबियाचे भाडोत्री सैनिक होते. तसेच या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला. ज्या न्याला विमानतळावर हा हल्ला करण्यात आला तो रॅपिड सपोर्ट फोर्सेसच्या ताब्यात आहे. तसेच सुदानचं लष्कर आमि आरएसएफ यांच्यामध्ये एप्रिल २०२३ पासून संघर्ष सुरू आहे.

लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  संयुक्त अरब अमिरातीचं हे विमान न्याला विमानतळावर उतरताच त्याच्यावर झालेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये पूर्णपणे नष्ट झालं आहे. हे विमान आखाती देशांमधील कुठल्यातरी विमानतळावरून उडाले होते. तसेच त्यामध्ये अनेक परदैशी सैनिक आणि आरएसएफसाठीची हत्यारे आणि उपकरणे होती, असा दावा सुदानच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला आहे. 

संयुक्त अरब अमिरातीकडून न्याला विमानतळाच्या माध्यमातून आसएसएफला ड्रोनसारख्या हत्यारांचा पुरवठा केला जात आहे, असा आरोप जनरल अब्देल फतह अल बुरहान यांच्या नेतृत्वाखालील सुदानच्या सैन्याकडून वारंवार केला जात आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीने आपल्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्ताव पेट्रो यांनी सांगितले की, ‘’कोलंबियाचं सरकार हे या हल्ल्यात किती कोलंबियन मारले गेले याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे मृतदेह परत आणता येतील का, याची चाचपणी करत आहोत. पेट्रो यांनी भाडोत्री सैनिकांच्या वापरावर बंदी घालण्याचेही संकेत दिले आहेत’’. कोलंबियामधून येणारे भाडोत्री सैनिक हे बहुतांशी माजी सैनिक किंवा गनिमी काव्याने लढणारे सैनिक असतात. असे सैनिक आधीही येमेन आणि आखाती देशांमध्ये संयुक्त अरब अमिरातीसाठी लढले आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनीही २०२४ च्या अखेरीस दार्फुरमध्ये कोलंबियन सैनिक असल्याचा वृत्तास दुजोरा दिला होता.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयairplaneविमानairforceहवाईदलUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती