शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

UAE सरकारचा मोठा निर्णय, पासपोर्टवर ‘असं’ नाव असलेल्या भारतीयांना आता ‘नो एन्ट्री’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 17:03 IST

युएई सरकारनं टुरिस्टसह निरनिराळ्या प्रकारच्या व्हिसावर येणाऱ्या लोकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणीतरी लवकरच संयुक्त अरब अमिरातीला (UAE) जाण्याच्या तयारीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. यूएई सरकारने प्रवास मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केला आहे. नवीन निर्देशांनुसार, आता जर कोणत्याही व्यक्तीच्या पासपोर्टवर फक्त एकच नाव लिहिलेले असेल, म्हणजे आडनावाचा कॉलम रिकामा असेल, तर तो यूएईला जाऊ शकत नाही आणि तिथूनही येऊ शकत नाही.

UAE सरकारच्या निर्देशानुसार सर्व प्रवाशांच्या पासपोर्टवर नाव आणि आडनाव दोन्ही स्पष्ट असणे आवश्यक आहे. 21 नोव्हेंबरपासून यूएईनेही हा नवा नियम लागू केला आहे. यूएई सरकारचा हवाला देत एअरलाइन्स कंपनी इंडिगोनेही एक निवेदन जारी केले आहे. इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, "यूएई सरकारच्या सूचनेनुसार, ज्या प्रवाशांच्या पासपोर्टवर एकच नाव आहे, मग ते पर्यटक असो किंवा कोणत्याही व्हिसावर, त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही."

परमनंट व्हिसा असलेल्यांना सूटजर कोणाला परमनंट व्हिसा असेल तर त्यांना त्यावर प्रवास करण्याची परवानगी असेल. यासाठी त्यांना पहिल्या आणि शेवटच्या नावाच्या कॉलममध्ये तेच नाव अपडेट करावे लागणार आहे. खलिज टाईम्सनं दिलेल्या रिपोर्टनुसार युएई सरकारनं याची घोषणा केल्यानंतर अनेकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

आम्ही दुतावासाकडून माहिती मिळण्याची वाट पाहत आहोत. यासाठी आम्ही लोकांना व्हिसा अप्लाय करण्यापूर्वी ४८ तासांचा वाट पाहण्याचा सल्ला देत आहोत, अशी प्रतिक्रिया एका ट्रॅव्हल कंपनीच्या कर्मचाऱ्यानं खलिज टाईम्सला दिली.

टॅग्स :Indiaभारतpassportपासपोर्टUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती