अमेरिकेत मंदिर विटंबनेचा प्रकार

By Admin | Updated: February 18, 2015 01:43 IST2015-02-18T01:43:10+5:302015-02-18T01:43:10+5:30

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर येथील हिंदू मंदिराची शनिवारी नासधूस करून त्याच्या भिंतीवरील स्वस्तिक चिन्हावर रंग फासण्यात आल्यामुळे हिंदू समाजाला धक्का बसला आहे.

The type of temple idol in America | अमेरिकेत मंदिर विटंबनेचा प्रकार

अमेरिकेत मंदिर विटंबनेचा प्रकार

वॉशिंग्टन : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर येथील हिंदू मंदिराची शनिवारी नासधूस करून त्याच्या भिंतीवरील स्वस्तिक चिन्हावर रंग फासण्यात आल्यामुळे हिंदू समाजाला धक्का बसला आहे.
सिएटल मेट्रोपोलिटन भागात अज्ञात समाजकंटकाने मंदिराच्या भिंतीवरील स्वस्तिक चिन्हावर रंग फासला व त्याच्या शेजारी ‘निघून जा’ (गेट आऊट) असा संदेश लिहिल्याचे उघडकीस आल्यानंतर ही घटना समोर आली. काऊंटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंदिराची पाहणी केली. बोथेल (वॉशिंग्टन) येथील हिंदू मंदिर व सांस्कृतिक केंद्र विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नित्य निरंजन यांनी सांगितले की, ‘या प्रकारच्या घटना अमेरिकेत व्हायला नकोत. कोणाला तुम्ही निघून जा, असे सांगणारे तुम्ही कोण? हा प्रवाशांचा देश आहे.’ मंगळवारी मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The type of temple idol in America