शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांच्या चिमुकल्याला खायला दिली केळी, अवघ्या 30 सेकंदातच आईच्या कुशीत झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 19:21 IST

मुलाला वाचवण्याचा आईने खूप प्रयत्न केला, पण ती त्याला वाचवू शकली नाही.

आईच्या निष्काळजीपणामुळे तिच्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा अवघ्या 30 सेकंदात वेदनादायक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना युनायटेड किंग्डममधील वेल्समध्ये घडली. महिलेने आपल्या दोन वर्षाच्या मुलाला झोपण्यापूर्वी दुधाच्या बाटलीऐवजी केळी (Banana) खायला दिली. पण, केळी खाल्यानंतर अवघ्या 30 सेकंदातच बाळाचा मृत्यू झाला.

मुलाच्या गळ्यात अडकली केळी

नॉर्थ वेल्स लाइव्ह न्यूजच्या वृत्तानुसार, युनायटेड किंगडमच्या वेल्समध्ये राहणाऱ्या डॅनिएल बटरली नावाच्या महिलेने तिच्या बाळाला झोपण्यापूर्वी दुधाच्या बाटलीऐवजी केळी खायला दिली होती. यानंतर ती काही कामासाठी खोलीबाहेर गेली. अवघ्या अर्ध्या मिनिटातच ती खोलीत परत आली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. परत आल्यावर तिला मुलाच्या गळ्यात केळी अडकलेली दिसली. केळी अडकल्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता. यावेळी तिने तात्काळ आपात्कालीन क्रमांकावर फोन करून मदत मागितली. पण, मदत यायला उशीर झाला.

अनेक प्रयत्न करुनही केळीचा तुकडा बाहेर आला नाही

महिलेने सांगितले की, मुलाचा आवाज ऐकून तो किती वेदनेत आहे, हे कळत होते. महिलेने त्याच्या गळ्यात अडकलेली केळी काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण, केळी बाहेर येण्याऐवजी अजून आत गेली. यावेळी तिने आपल्या बहिणीलाही मदतीसाठी बोलावले पण त्या सर्वांचे  प्रयत्न अपयशी ठरले आणि आईच्या कुशीतच तिच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, त्या चिमुकल्याचा मृत्यू हायपोक्सिक कार्डिअॅक अरेस्टमुळे झाला.   

टॅग्स :Deathमृत्यूInternationalआंतरराष्ट्रीय