बेल्जियममध्ये दोन संशयित अटकेत
By Admin | Updated: December 30, 2015 02:34 IST2015-12-30T02:34:24+5:302015-12-30T02:34:24+5:30
नववर्षाच्या सुटीदरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या संशयावरून ब्रसेल्समध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली. रविवार व सोमवारी पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेत ही कारवाई झाली.

बेल्जियममध्ये दोन संशयित अटकेत
ब्रसेल्स : नववर्षाच्या सुटीदरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या संशयावरून ब्रसेल्समध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली. रविवार व सोमवारी पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेत ही कारवाई झाली. हे नेमके कोण आहेत याची माहिती देण्यात आलेली नाही. पण ताब्यात घेतलेल्यांपैकी एकावर दहशतवादी कारवायांसाठी तरुणांची भरती केल्याचा, तर दुसऱ्यावर दहशतवादी कारवायांसाठी मदत केल्याचा आरोप आहे. शोधमोहिमेत प्रशिक्षण गणवेश, इसिसची प्रचार सामग्री व संगणक आदी साहित्य जप्त केले आहे. हत्यारे वा स्फोटके मिळाली नाहीत. (वृत्तसंस्था)
यातील कोणतीही माहिती जाहीर केली जाणार नाही; पण हे सर्व पॅरिस घटनेशी संबंधित नाही, असे त्यांनी सांगितले. पॅरिस हल्ल्याचा संबंध बेल्जियममधील काही संशयितांशी मानला जातो.