चीनमध्ये तीन तासात बांधली दुमजली इमारत
By Admin | Updated: July 21, 2015 00:23 IST2015-07-21T00:23:15+5:302015-07-21T00:23:15+5:30
चीनमधील एका कंपनीने थ्री डी प्रिंटच्या साहाय्याने तीन तासांत दोन मजली इमारत बांधली असून, केवळ भिंती उभ्या न करता आतील सजावट

चीनमध्ये तीन तासात बांधली दुमजली इमारत
बीजिंग : चीनमधील एका कंपनीने थ्री डी प्रिंटच्या साहाय्याने तीन तासांत दोन मजली इमारत बांधली असून, केवळ भिंती उभ्या न करता आतील सजावट, पाईपलाईनची कामे, तारांचे बिछाने बनविण्याचे काम, तसेच इतर सुविधाही पूर्ण करण्यात आल्या आहेत. चीनच्या शांक्सी प्रांतात १७ जुलै रोजी क्रेनच्या साहाय्याने ही इमारत उभारण्यात आली आहे. तीन तासापेक्षाही कमी वेळात बैठक , शयनगृह, स्वयंपाकगृह व आरामाच्या खोलीची निर्मिती करण्यात आली. या इमारतीची प्रतिकृती थ्रीडी प्रिंटरवर तयार करण्यात आली होती.
कोणतीही दोन मजली इमारत पूर्ण करण्यास किमान सहा महिन्याचा वेळ लागतो; पण थ्रीडी प्रिंटरवर इमारतीची प्रतिमा तयार केल्यास तेच काम काही दिवसात होऊ शकते, असे या इमारतीची निर्मिती करणाऱ्या प्रभारी अभियंत्याने सांगितले.
पीपल्स डेली आॅनलाईनवर या इमारतीची माहिती देण्यात आली आहे. या इमारतीचा बांधकाम खर्च ४०० ते ४५० डॉलर प्रति चौ. मीटर इतका आहे. (वृत्तसंस्था)