भारत दौऱ्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत करत सफेद रंगाच्या टोयोटा फॉर्च्यूनरमधून प्रवास केला. त्याचवेळी आशियाच्या दुसऱ्या कोपऱ्यात चीन आणि जपान यांच्यातील तणाव वाढला होता. आता रशियानेचीनसोबत मिळून जपानला स्पष्ट वॉर्निंग देणारं सैन्य पाऊल उचलले आहे. रशिया पेट्रोलिंगसाठी अण्वस्त्रसंपन्न युद्धनौका चिनी सैन्याच्या समर्थनार्थ तैनात करणार आहे.
जपानच्या संरक्षण मंत्रालयानुसार, मंगळवारी रात्री रशिया आणि चीनच्या हवाई दलाने जपानच्या चहुबाजूने जॉईँट लॉग्न रेंज पेट्रोलिंग केले. रशियाचे २ टीयू ९५ न्यूक्लियर केपेबल स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स जपानी समुद्रातून उड्डाण घेत पूर्व चीनच्या समुद्रात पोहचले. ज्याठिकाणी चीनचे २ एच ६ बॉम्बर्स सहभागी झाले. त्यानंतर या चारही विमानांनी प्रशांत महासागरात संयुक्त उड्डाण केले. इतकेच नाही तर चीनचे चार जे १६ फायटर जेट्सही या विमानांसोबत जपानच्या ओकिनावा आणि मियाको बेटांमधील मियाको स्ट्रेटहून उड्डाण घेत सहभागी झाले. हा परिसर आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग मानला जातो, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने जपानसाठी तो अत्यंत संवेदनशील आहे.
जपानविरोधात रशिया चीनचं शक्तीप्रदर्शन
रशिया-चीनच्या या हालचाली पाहता जपानने तातडीने त्यांच्या फायटर जेटला तयार राहण्यास सांगितले. त्याशिवाय एअर डिफेन्स आइडेंटिंफिकेशन झोनवर करडी नजर ठेवली. रशिया आणि चीन यांच्या संयुक्त हालचाली स्पष्टपणे आमच्या देशाविरोधात शक्ती प्रदर्शन आहे जे आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे असं जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांनी म्हटलं आहे.
जपानी पंतप्रधानांच्या विधानानं चीन नाराज
दक्षिण कोरियानेही त्यांच्या एअर डिफेन्स झोनमध्ये रशियाचे सात आणि चीनचे २ सैन्य विमान शिरल्याचं सांगितले. त्यामुळे परिस्थिती आणखी संवेदनशील बनली आहे. या भागात तणाव कित्येक पटीने वाढला आहे. जपानी पंतप्रधान सना ताकाइची यांच्या विधानाने चीन नाराज आहे. जर चीनने तैवानवर कुठलीही सैन्य कारवाई केली तर त्यामुळे जपानच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, त्याला आम्हीही उत्तर देऊ असं सना ताकाइचा यांनी म्हटलं होते.
Web Summary : Russia and China conduct joint patrols near Japan, prompting fighter jet scrambles. Japan expresses concern over security implications after the drills. Tensions rise due to statements regarding Taiwan.
Web Summary : रूस और चीन ने जापान के पास संयुक्त गश्त की, जिसके बाद लड़ाकू विमानों को भेजा गया। जापान ने सुरक्षा निहितार्थों पर चिंता व्यक्त की। ताइवान को लेकर बयानों से तनाव बढ़ गया है।