इराकची राजधानी बगदादमध्ये दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट, ७५ ठार
By Admin | Updated: July 3, 2016 14:06 IST2016-07-03T14:06:50+5:302016-07-03T14:06:50+5:30
इराकची राजधानी बगदादमध्ये दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटात ७५ पेक्षा जास्त नागरीक ठार झाले असून, १६० पेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत.

इराकची राजधानी बगदादमध्ये दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट, ७५ ठार
ऑनलाइन लोकमत
बगदाद, दि. ३ - इराकची राजधानी बगदादमध्ये दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटात ७५ पेक्षा जास्त नागरीक ठार झाले असून, १६० पेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. बगदादच्या मध्यवर्ती भागात हे बॉम्बस्फोट झाले असून, इसिसने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे.
रमजानचा उपवास सोडल्यानंतर अनेक कुटुंब आणि तरुणाई खरेदीसाठी बाजारात उतरली होती. त्यावेळीच इसिसच्या अतिरेक्यांनी हे बॉम्बस्फोट घडवून आणले.
पूर्व बगदादमध्ये आज सकाळी झालेल्या दुस-या बॉम्बस्फोटात पाच जण ठार आणि १६ जण जखमी झाले. इराकी सैन्य पथकांनी फालुजा शहर इसिसकडून आपल्या ताब्यात घेतल्यानंतर हा हल्ला झाला आहे.