दुबई : पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र होत असताना इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांना सोमवारी रात्री हवाई हल्ल्यात ठार मारल्याचा दावा इस्रायलने केला. तसेच अन्य कारवाईत इराणमधील निमलष्करी संघटना ‘बसीज’चे प्रमुख घोलाम रेजा सोलेमानी यांनाही ठार मारल्याचे इस्रायलने म्हटले आहे. मात्र, इराणने या मृत्यूंची पुष्टी केलेली नाही.
इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला खामेनेई आणि इतर वरिष्ठ अधिकारी ठार झाल्यानंतर लारिजानी प्रत्यक्षात देशाची सुत्रे हाताळत असल्याचे मानले जात होते. तर सोलेमानी अस्वस्थ इराणमध्ये देशांतर्गत कायदा-सुव्यवस्थेची सूत्रे सांभाळत होते.
अली लारिजानी सत्तारचनेतील प्रमुख लारिजानी हे इराणमधील प्रभावशाली राजकीय कुटुंबातून येतात. त्यांनी १९९०च्या दशकात सांस्कृतिक मंत्री म्हणून देशात कडक सेन्सॉरशिप केली होती. २००८ ते २०२० या काळात ते संसदेचे अध्यक्ष होते आणि नंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख होते. अमेरिकेशी अणुचर्चांमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ट्रम्प प्रशासनाशी चर्चांसाठी ते मध्यस्थांशी ओमानमध्ये भेटले होते. लारिजानी यांनी तत्त्वज्ञानावर ६ पुस्तके लिहिली असून, त्यापैकी ३ पुस्तके जर्मन तत्वज्ञ इमॅन्युएल कांट यांच्यावर आधारित आहेत.
Web Summary : Israel claims to have killed Iranian security chief Ali Larijani and Basij chief Gholam Reza Soleimani in airstrikes. Larijani, a key figure in Iranian politics and nuclear talks, and Soleimani, responsible for internal security, were reportedly targeted. Iran has not confirmed these deaths. Larijani was seen as de facto leader after senior officials were killed.
Web Summary : इज़राइल का दावा है कि उसने हवाई हमलों में ईरानी सुरक्षा प्रमुख अली लारीजानी और बसीज प्रमुख घोलाम रेजा सोलेमानी को मार डाला। लारीजानी, ईरानी राजनीति और परमाणु वार्ता में एक प्रमुख व्यक्ति, और सोलेमानी, जो आंतरिक सुरक्षा के लिए जिम्मेदार थे, को कथित तौर पर निशाना बनाया गया था। ईरान ने इन मौतों की पुष्टि नहीं की है। लारीजानी को वरिष्ठ अधिकारियों के मारे जाने के बाद वास्तविक नेता के रूप में देखा गया था।