ऑनलाइन लोकमत पेनसिल्वेनिया, दि. 3 - होव्हरबोर्डमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत दोन मुली जळून मृत पावल्याचा निष्कर्षाप्रत फेडरल सुरक्षा नियामक आले आहेत. हॅरिसबर्ग येथे १0 मार्चला ही दुर्घटना होऊन १0 व ३ वर्षे वयाच्या दोन मुली ठार झाल्या होत्या. लेझ बोर्ड यंत्रणेमध्ये हा दोष असल्याचे अमेरिकेच्या कन्ज्युमर प्रॉडक्ट सेफ्टी कमिशनने भारतीय वेळेनुसार मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जाहीर केले.
सदोष होव्हरबोर्डमुळे दोन मुलींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 01:57 IST