शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

रशियातील दोन मेट्रो स्थानकांत स्फोट, 10 ठार, 20 जखमी

By admin | Published: April 03, 2017 6:05 PM

रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील मेट्रो स्टेशनवर मोठा स्पोट झाला असून, या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला

 ऑनलाइन लोकमत

मॉस्को, दि. 3 - रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील दोन मेट्रो स्थानकांमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. सेंट पीटर्सबर्ग शहरातील सनाया स्क्वेअर या भूमिगत मेट्रो स्टेशनमध्ये हा स्फोट झाला आहे. रशियाचे राष्ट्पती ब्लादिमीर पुतीन शहरात असून, त्यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या स्फोटांचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र रशियाचे राष्ट्रपती यांनी या स्फोटांमागील दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारलेली नाही. स्फोटानंतर सोशल मीडियावर काही छायाचित्रे प्रसारित झाली असून, त्यात एका मेट्रोच्या डब्याचा दरवाजा स्फोटाने उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे.  दरम्यान, या स्फोटांनंतर मेट्रो स्टेशनमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, स्फोटांनंतर खबरदारीचा उपाय म्हणून आठ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. दरम्यान या स्फोटात 10 जण मृत्युमुखी तर 20 जण जखमी झाल्याची माहिती रशियाच्या गव्हर्नरांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. 

सेंट पीटर्सबर्ग मेट्रोने या स्पोटांबाबत प्रसिद्ध केलेल्या आपल्या पत्रकात ट्रेनमध्ये कुठल्या तरी अज्ञात वस्तूद्वारे स्फोट घडवून आणण्यात आल्याचे सांगितले. रशियातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी या स्फोटांबाबत दिलेल्या वृत्तात ट्रेनमध्ये  स्पोटके लावून स्फोट घडवून आणण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान रशियन सुरक्षा यंत्रणा  या स्फोटांचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का याचा शोध घेत आहेत. 
याआधी 2010 साली मॉस्को येथील दोन मेट्रो स्टेशनांमध्ये झालेल्या  आत्मघाती हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जखमी झाले होते. त्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी चेचेन विद्रोह्यांनी घेतली होती.