शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिसमधील चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू; आयसिसनं स्वीकारली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 07:19 IST

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात व्यक्तीनं चाकू हल्ला केला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

पॅरिस: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात व्यक्तीनं चाकू हल्ला केला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या कारवाईत अज्ञात हल्लेखोर ठार झाला असून या हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं स्वीकारली आहे. शनिवारी संध्याकाळी पॅरिसच्या मध्यवर्ती भागात एका अज्ञात व्यक्तीनं आसपास असलेल्या लोकांवर चाकूहल्ला सुरु केला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. चौघा जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर चाकूनं वार करण्याआधी 'अल्लाहू अकबर' असं ओरडत होता. या माहितीच्या आधारे आता या प्रकरणाचा दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीनं तपास करण्यात येत आहे. 

चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ठार केल्याची माहिती गृहमंत्री गेरार्ड कोलॉम्ब यांनी दिली. कोलॉम्ब यांनी पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं आहे. मात्र अद्याप हल्लेखोराची ओळख पटू शकलेली नाही. फ्रान्समध्ये 2015 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. सेंट डेनिसमध्ये भागात झालेल्या हल्ल्यात 129 लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर 2016 मध्ये फ्रेंच नॅशनल डेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीमध्ये ट्रक घुसवण्यात आल्यानं 84 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात 50 हून अधिक जण जखमी झाले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 230 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी