शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

तुर्कीत भूकंपातून वाचलेली दोन बालके बनली आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 08:39 IST

अरिफच्या शरीराचा कमरेपासून पायापर्यंतचा भाग उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता. आपली सुटका व्हावी म्हणून तो आकांत करत होता.

अंकारा : तुर्कस्थान, सिरियामध्ये झालेल्या भयंकर भूकंपामुळे कोसळलेल्या शेकडो इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अजून काही हजार लोक दबले असण्याची भीती आहे. त्यांची सुटका करण्यासाठी तुर्कस्थान, सिरियामध्ये मिळून सुमारे एक लाख सैनिक, स्वयंसेवक मदतकार्यात सहभागी झाले आहेत. तुर्कस्थानमधील कहरामनमरस या शहरात अरिफ खान नावाच्या ३ वर्षे वयाच्या बालकाची व आणखी एका शहरामध्ये १० वर्षांच्या बालिकेची इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली. त्यांच्या कहाणीमुळे भूकंपग्रस्ताच्या आयुष्यात आशेचा एक किरण निर्माण झाला आहे. अरिफच्या शरीराचा कमरेपासून पायापर्यंतचा भाग उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता. आपली सुटका व्हावी म्हणून तो आकांत करत होता. मदतपथकातील लोकांनी कडक थंडीपासून बचाव होण्यासाठी त्याच्या अंगावर ब्लँकेट पांघरले. ढिगारा उपसण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले. अरिफचे वडील इर्तुगुल किसी हे देखील या बचावकार्यात सहभागी झाले होते. सिमेट-क्राँक्रिटचे ढीग बाजूला काढून अरिफला जेव्हा बाहेर काढण्यात आले तेव्हा वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 

बेतुलचे प्राण वाचविले-    तुर्कस्थानात १० वर्षे वयाच्या बेतुल इदिस या बालिकेची मदतपथकाने ढिगाऱ्याखालून सुटका केली. -   मात्र अजूनही काही हजार लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. 

अर्भकाला केले अनाथ-    इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एका अर्भकाचा रडण्याचा आवाज आला. त्याला बाहेर काढण्यात आले. -   त्याचे आईबाबा व कुटुंबातील सारे सदस्य मरण पावले आहेत. अख्खे कुटुंब भूकंपात गमावल्याच्या कहाण्या घराघरांत आहेत.

जगभरातून मदतीचा ओघ भारताने सिरियाला सुमारे सहा टन इतक्या अत्यावश्यक गोष्टींची मदत केली आहे. विमानातून ही मदत त्या देशात रवाना करण्यात आली. याआधी भारताने तुर्कस्थानला ८९ डॉक्टरांचे वैद्यकीय मदतपथक पाठविले आहे. त्यांच्यासोबत क्ष-किरण यंत्र, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन जनरेशन प्लांट अशा अनेक गोष्टी रवाना करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :EarthquakeभूकंपSyriaसीरियाDeathमृत्यूBuilding Collapseइमारत दुर्घटना