थायलंड दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
By Admin | Updated: August 12, 2016 00:05 IST2016-08-12T00:05:05+5:302016-08-12T00:05:05+5:30
थायलंडमधल्या हुआ हिन इथलं थाइ रिसॉर्ट दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे.

थायलंड दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
ऑनलाइन लोकमत
थायलंड, दि. 11- थायलंडमधल्या हुआ हिन इथलं थाइ रिसॉर्ट दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे. या बॉम्बस्फोटात एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त डेली मेलनं दिलं आहे. या भीषण बॉम्बस्फोटात जवळपास 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. जखमींना तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
थाइ रिसॉर्टला लागून असलेल्या समुद्रावरील मुख्य ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांमध्ये काही विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. थाइ रिसॉर्टमधल्या एका वस्तूमध्ये हे बॉम्ब आधीपासूनच ठेवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीतीही थाडलंड प्रशासनानं व्यक्त केली आहे.