काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट, २४ ठार

By Admin | Updated: September 5, 2016 20:08 IST2016-09-05T18:02:14+5:302016-09-05T20:08:56+5:30

अफगाणिस्तानची राजधानी काबूल सोमवारी दोन बॉम्बस्फोटांनी हादरले. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाजवळ हे स्फोट झाले.

Two blasts in Kabul, 24 killed | काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट, २४ ठार

काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट, २४ ठार

ऑनलाइन लोकमत 

काबूल, दि. ५ - अफगाणिस्तानची राजधानी काबूल सोमवारी दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरली. दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले. या स्फोटात २४ जण ठार झाले असून, ९१ जण जखमी झाले आहेत.  संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाजवळ हे स्फोट झाले. 
 
दोन आठवडयांच्या आत काबूलमध्ये पुन्हा हल्ला झाला आहे. नुकताच काबूलमधील अमेरिकन विद्यापीठामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १३ जण ठार झाले होते. अफगाणिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करुनही दहशतवादी खुलेआम बॉम्बस्फोट घडवित आहेत. 

Web Title: Two blasts in Kabul, 24 killed