ट्विटर करणार कर्मचारी कपात
By Admin | Updated: October 13, 2015 21:01 IST2015-10-13T21:01:32+5:302015-10-13T21:01:32+5:30
सोशल मिडीयातमध्ये सर्वाधिक नावारुपाला आलेले ट्विटर कर्मचारी कपात करणार असल्याचे वृत्त आहे. येत्या काही दिवसात ट्विटर आपल्या जवळजवळ ३३६ कर्मचा-यांना घरचा

ट्विटर करणार कर्मचारी कपात
ऑनलाइन लोकमत
सॅन फ्रान्सिस्को, दि. १३ - सोशल मिडीयातमध्ये सर्वाधिक नावारुपाला आलेले ट्विटर कर्मचारी कपात करणार असल्याचे वृत्त आहे. येत्या काही दिवसात ट्विटर आपल्या जवळजवळ ३३६ कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखविणार आहे.
ट्विटर कंपनीत सध्या ४१०० कर्मचारी कार्यरत असून यामधून आठ टक्के म्हणचेच ३३६ कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीचे सीईओ जॅक डॉरसे यांनी केली आहे. काही प्रमाणात कर्मचा-यांची कपात केल्याने कंपनीला फायदा होणार असून कंपनीच्या आगामी वाटचालीसाठी हा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे जॅक डॉरसे यांनी म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी कंपनीच्या सर्व कर्मचा-यांना ई-मेलच्या माध्यमातून जॅक डॉरसे यांनी कळविले आहे.