शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Twitter New CEO : कुत्रा बनला Twitter चा CEO; Elon Musk यांची मोठी घोषणा, म्हणाले- 'हा इतरांपेक्षा चांगला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 15:44 IST

Twitter New CEO : इलॉन मस्क यांनी आपल्या पाळी कुत्र्याला ट्विटरचा नवीन CEO बनवले आहे.

Twitter New CEO : प्रत्येक मोठ्या कंपनीमध्ये एक CEO असतो, ज्याच्यावर कंपनीची जबाबदारी असते. तो आपल्या बुद्धीकौशल्याने कंपनीच्या वाढीसाठी काम करत असतो. पण, तुम्ही एखादा प्राणी कंपनीचा सीईओ झाल्याचे ऐकले आहे का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांचा पाळी कुत्रा फ्लोकीला ट्विटरचा (Twitter) सीईओ बनवले आहे. 

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेण्यापूर्वी पराग अग्रवाल (Parag Agarwal) ट्विटरचे सीईओ होते, मात्र मस्क ट्विटरचे मालक झाल्यानंतर त्यांनी पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. पराग अग्रवाल यांना हटवल्यानंतर इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओपदाची जबाबदारी स्विकारली. पण, काही दिवसानंतर त्यांनी नवीन सीईओच्या शोधात असल्याचे सांगितले. आता अखेर त्यांना नवीन सीईओ मिळाला आहे.

फ्लोकी बनला ट्विटरचा नवीन सीईओ इलॉन मस्क यांना वाटते की, त्यांचा कुत्रा फ्लोकी इतर सीईओंपेक्षा खूपच चांगला आहे. इथे त्यांचा संदर्भ थेट पराग अग्रवाल यांच्याकडे आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरला 44 बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतल्यानंतर त्यांनी ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकले होते. केवळ अग्रवालच नाही तर मस्क यांनी अनेक कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढले. आता मस्क यांनी त्यांचा पाळीव कुत्रा फ्लोकी याला ट्विटरच्या सीईओच्या खुर्चीवर बसवले आहे.

इलॉन मस्क यांनी सीईओच्या खुर्चीवर बसलेला त्यांचा कुत्रा फ्लोकीचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये फ्लोकी ब्रँडेड ब्लॅक टी-शर्ट घातलेला दिसत आहे, ज्यावर सीईओ लिहिले आहे. फोटोत फ्लोकीसमोर टेबलावर काही कागदपत्रे दिसत आहेत, ज्यात फ्लोकीच्या पंजाचे ठसे आणि Twitter लोगो देखील आहे. फ्लोकीच्या समोर एक छोटा लॅपटॉप देखील आहे, ज्यामध्ये ट्विटरचा लोगो बनवला आहे.  

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्कtechnologyतंत्रज्ञानdogकुत्रा