ट्विटरची डुबकी, फेसबुकची तेजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2016 22:05 IST2016-05-02T22:05:00+5:302016-05-02T22:05:00+5:30
सोशल मीडियामध्ये कोण अधिराज्य गाजवणार, या युद्धात ट्विटरवर आणि फेसबुक यांच्यापैकी फेसबुकने बाजी मारली आहे. अमेरिकेच्या नॅस्डॅक शेअर बाजारात फेसबुकचे शेअर झपाट्याने वाढत आहेत

ट्विटरची डुबकी, फेसबुकची तेजी!
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ : आजच्या टेक्नोसॅव्ही युगात आबालवृद्धांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं फेसबूक आणि ट्विटर यामध्ये आघाडीवर कोण जाणार यासाठी दोन्ही दररोज बदल करत असतात. आपले जाळे वाढवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियामध्ये कोण अधिराज्य गाजवणार, या युद्धात ट्विटरवर आणि फेसबुक यांच्यापैकी फेसबुकने बाजी मारली आहे. अमेरिकेच्या नॅस्डॅक शेअर बाजारात फेसबुकचे शेअर झपाट्याने वाढत आहेत आणि दुसरीकडे ट्विटररने गेल्या वर्षभरात सपाटून मार खाल्ला आहे.
गेल्या वर्षभरात फेसबुकचे शेअर जवळपास ५० टक्क्यांनी तेजीत आहेत तर ट्विटरचे शेअर्स ८० टक्क्यांनी घटले आहेत.
फेसबूक कंपनीच्या नफ्यात सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे महसूल ६५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. सोशल मीडियात फेसबुकची मोठी क्रेझ आहे. फेसबूकच्या युजर संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. नेटीझन्सचा फेसबुकच्याच इन्स्टाग्रामला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
याउलट परिस्थिती ट्विटरची आहे. ट्विटर कंपनीच्या उत्पन्नात वर्षभरात फारशी तेजी आली नाही. गेल्या काही महिन्यांतील नफा फारसा उत्साहजनक नाही. युजर्सची संख्या वाढावण्यात म्हणावे तेवढे यश नाही. यामुळे सोशल मिडियात ट्विटरची डुबकी, फेसबुकची तेजी! बघायला मिळत आहे.