शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

चीनची तळी उचलणारी दीड लाख ट्विटर खाती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 03:44 IST

चीन सरकारच्या वादग्रस्त धोरणांचे समर्थन करणारी सुमारे १ लाख ७० हजार खाती ट्विटरकडून बंद

मुंबई : चीनने कोरोना संक्रमणाबाबत कोणतीही लपवाछपवी न करता योग्य वेळी माहिती दिली. तसेच, हाँगकाँगबाबत चीनचे धोरणही योग्यच आहे असा प्रचार करणारी आणि चीन सरकारच्या वादग्रस्त धोरणांचे समर्थन करणारी सुमारे १ लाख ७० हजार खाती ट्विटरने बंद केली आहेत.चीनने हाँगकाँगसाठी लागू केलेल्या नव्या कायद्याच्याविरोधात जगभारातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून हाँगकाँग येथे लोकशाहीच्या समर्थनार्थ आंदोलनही सुरू आहे. त्याला अनेकदा हिंसक वळणही लागले. परंतु, ही ट्विटर खाती चीनच्या या प्रयत्नांचे समर्थन करत होती. त्याशिवाय कोरोना विषाणूबाबाच चीनने लपवाछपवी केल्याचे आरोप अमेरिकेने केलेला आहे.चीनच्या भूमिकावर जगभरात संशयाचे वातावरण आहे. परंतु, चीनने योग्य वेळी माहिती दिल्याचे दावे या खात्यांवरून केले जात होते. चीनचे प्रत्येक धोरण हे योग्यच आहे असे ठसविण्याचा प्रयत्न त्यावर होत होता. चीन आणि तिथल्या कम्युनिस्ट पक्षाची धोरणे ही योग्यच असल्याचा प्रचारही सुरू होता. परंतु, चीन सरकारची तळी उचलून धरणारी ही खाती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे ट्विटरने नमूद केले आहे. चीनमध्ये ट्विटरचा अधिकृतरीत्या वापर बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतरही व्हीपीएन नेटवर्क च्या साहाय्याने ही खाती कार्यरत होती. त्या खात्यांवर चिनी भाषेतच मजकूर प्रसिद्ध केले जात होते. २३ हजार ७५० खाती तर चिनी प्रवक्ते असल्याप्रमाणे सक्रिय होती. रशिया आणि तुर्की या देशातील काही खातीसुद्धा याच कारणास्तव बंद करण्यात आली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनTwitterट्विटर