तीन महिन्यांत दोनदा १० लाखाची लॉटरी
By Admin | Updated: August 1, 2014 00:33 IST2014-08-01T00:33:03+5:302014-08-01T00:33:03+5:30
अमेरिकेच्या इंडियानापोलिस राज्यातील एका व्यक्तीला गेल्या तीन महिन्यांत दोनदा दहा लाख डॉलरची लॉटरी लागली आहे.

तीन महिन्यांत दोनदा १० लाखाची लॉटरी
इंडियानापोलिस : अमेरिकेच्या इंडियानापोलिस राज्यातील एका व्यक्तीला गेल्या तीन महिन्यांत दोनदा दहा लाख डॉलरची लॉटरी लागली आहे. रॉबर्ट हॅमिल्टन असे या भाग्यवान व्यक्तीचे नाव आहे. रॉबर्टने गेल्या आठवड्यात इंडियानापोलिस येथील एका दुकानातून घेतलेल्या लॉटरी तिकिटाला दहा लाख डॉलरचे बक्षीस लागले. यापूर्वी एप्रिलमध्येही रॉबर्टला असाच जॅकपॉट लागला होता.