शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

तुर्कस्तान, सिरिया भूकंप; मृतांचा आकडा ६२०० वर, २००० किमीपर्यंतची जमीन का हादरली? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 06:33 IST

६,२०० हून अधिक मृत्यू तुर्कस्तान आणि सिरियामध्ये भूकंपात झाले असून बचावकार्य वेगात सुरू आहे. इमारतींखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात येत असल्याने बळींची संख्या वाढत आहे. 

नवी दिल्ली : ६ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे ४:१५ वाजल्यापासून तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे हादरे बसायला सुरुवात झाली. पहिला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तेव्हा त्यातून निघणाऱ्या भूकंपाच्या लहरी २६६ कि.मी.पर्यंत पसरत गेल्या. तीव्र भूकंपाची खोली १० ते २० किमी दरम्यान असते. दियारबकीर शहरात पहिल्याच धक्क्याने १८ मजली उंच इमारत कोसळली. पहिल्या लाटेचा प्रभाव २ हजार कि.मी.पर्यंत जाणवला.

भूकंप नेमका का? -तुर्कीच्या खाली ‘टेक्टोनिक्स सोनिक प्लेट’ (भूस्तर) सतत कंपन करत आहे. ती ‘अफरिन प्लेट’वर दबाव आणत आहे. त्यामुळे येथे सात रिश्टरपेक्षाही अधिक तीव्रतेचे भूकंप होतात. दुसरीकडे, अरेबियन टेक्टोनिक प्लेट तुर्की प्लेटला दाबत आहे. युरेशियन प्लेटवरून वेगळ्या दिशेने फिरत आहे. या प्लेट्सच्या ढकलण्यामुळे भूकंप होत आहेत. 

दोनदा भूकंप का? -तुर्कीच्या खाली असलेला सूक्ष्म भूस्तर उलट दिशेने फिरत आहे. अरेबियन स्तर या छोट्या स्तराला धक्का देत आहेत. फिरणाऱ्या ॲनाटोलियन स्तराला अरेबियन प्लेटने धक्का दिला की, ती युरेशियन स्तराला आदळते. त्यामुळे दोनदा भूकंप होतात.

आता सतत दबाव -तळाचा स्तर पूर्वी मागे होता, जो आता सतत दबावामुळे पुढे सरकत आहे. त्यामुळे वरच्या जमिनीला तडे जाण्याची शक्यता असते. 

६,२०० हून अधिक मृत्यू -६,२०० हून अधिक मृत्यू तुर्कस्तान आणि सिरियामध्ये भूकंपात झाले असून बचावकार्य वेगात सुरू आहे. इमारतींखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात येत असल्याने बळींची संख्या वाढत आहे. 

भारताची भरीव मदतभूकंपग्रस्त तुर्कस्तानला मदत करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचा एक भाग म्हणून भारतीय लष्कराने मंगळवारी तुर्कस्तानच्या लोकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी ८९ डॉक्टरांचे एक पथक पाठवले. त्यांच्याबरोबर क्ष-किरण मशीन, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन जनरेशन प्लांट, कार्डियाक मॉनिटर्स आदी उपकरणे आहेत. मदत सामग्रीसह पहिले विमान सोमवारी रात्री रवाना करण्यात आले. तुर्कीचे दु:ख मी समजू शकतो : मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तुर्कीतील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी मोदी म्हणाले, ‘तुर्की आज कोणत्या परिस्थितीतून जात आहे ते मी समजू शकतो. २००१ मध्ये भूजला भूकंप झाला तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. बचाव कार्यात काय अडचणी आहेत हे मला माहीत आहे.

डोळ्यांत अश्रू अन् जगण्याची आशा... -

भूकंपातून आश्चर्यकारकपणे बचावल्यानंतर ढिगाऱ्याखाली ७ वर्षांची चिमुकली लहानग्या भावाच्या रक्षणासाठी त्याच्या डोक्यावर हात ठेवून मदतीची वाट बघताना...

टॅग्स :SyriaसीरियाEarthquakeभूकंपDeathमृत्यू