शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

Turkey-Syria Earthquake: तुर्की-सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांचा आकडा 5000 वर; युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:56 IST

Turkey-Syria Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचे भूकंप आले. यानंतर जगभरातील अनेक देशांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पथके पाठवली आहेत.

Turkey-Syria Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप आणि आफ्टरशॉकमुळे आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील अनेक देशांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पथके पाठवली आहेत. तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने सांगितले की, आपत्कालीन सेवांचे 24,400 हून अधिक कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे, कारण बचावकर्त्यांनी मंगळवारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू केला आहे.

लोकांनी शॉपिंग मॉल्स आणि स्टेडियममध्ये घेतला आश्रय या भूकंपामुळे दोन्ही देशातील हजारो इमारती आणि घरे कोसळले असून, मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. लोकांनी शॉपिंग मॉल्स आणि स्टेडियम, मशिदी आणि सामुदायिक केंद्रांमध्ये आश्रय घेतला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानच्या गाझिआनटेप शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर होता. 

सीरियातही अनेक लोकांचा मृत्यू झालामंगळवारी तुर्की अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तुर्कीच्या 10 प्रांतांमध्ये किमान 3,381 मरण पावले, तर 20,000 हून अधिक लोक जखमी झाले. सीरियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सीरियन सरकारच्या ताब्यात असलेल्या भागात भूकंप-संबंधित घटनांमध्ये आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या 769 झाली आहे, तर सुमारे 1,450 लोक जखमी झाले आहेत. 

7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाया दुर्घटनेनंतर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी सर्वप्रथम तुर्कीला मदत करण्याची घोषणा केली. ते वैद्यकीय साहित्य आणि 60 कर्मचार्‍यांच्या शोध आणि बचाव पथकासह 50 सैनिक पाठवण्यास तयार आहेत. मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी भारतातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे एक पथक मंगळवारी तुर्कीला रवाना झाले. 

टॅग्स :EarthquakeभूकंपInternationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यू