शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

पाकिस्तान रडणार! 'दोस्त दोस्त ना रहा...'; तुर्की सख्ख्या मित्राची साथ सोडून भारताच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 15:56 IST

Turkey, India Tension will end soon on Kashmir Article 370: गेल्याच आठवड्याच तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुथ औसुओग्लू यांनी ताजिकीस्तानमध्ये एका सम्मेलनात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था आणि व्यापारावर लक्ष देण्यासोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर जोर दिला होता. ते 29 मार्चला भेटले होते. 

जम्मू-काश्मीरचा अनुच्छेद 370 रद्द केल्याने भारत आणि तुर्कस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा तनाव आता निवळू लागला असून तुर्की पाकिस्तानची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वात तुर्की अफगाणिस्तानमध्ये शांतता चर्चेसाठी तयार झाला आहे. (Tensions between Indian and Turkey had heightened after Modi govt scrapped Article 370 in J&K in August 2019.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द करून टाकला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. याला तुर्कीनेदेखील पाठिंबा दिला होता. यामुळे तुर्की पाकिस्तानचा समर्थक असल्याचे मानले जात होते. आता भारत आणि तुर्कीमध्ये संबंध सुधारत असून हा पाकिस्तानला धक्का मानला जात आहे. 

रविवारी तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याची निंदा केली. या आधीही  तुर्कीने अशाप्रकारे दु:ख व्यक्त केले होते. परंतू रविवारचे वक्तव्य खूप महत्वाचे आहे. कारण भारतातील अंतर्गत सुरक्षेसंबंधी घटनेवर तुर्की बोलला आहे. नक्षलवादी आणि दहशतवादी हे दोन्ही मुद्दे सारखेच आहेत. दोन्ही गट भारताविरोधात कटकारस्थाने रचत असतात. यामुळे पाकिस्तानला तुर्कीने एकप्रकारे संकेत दिले आहेत. 

गेल्याच आठवड्याच तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुथ औसुओग्लू यांनी ताजिकीस्तानमध्ये एका सम्मेलनात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था आणि व्यापारावर लक्ष देण्यासोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर जोर दिला होता. ते 29 मार्चला भेटले होते. नवी दिल्ली आणि अंकारामध्ये तेव्हा तणावाचे वातावरण होते. जम्मू काश्मीरचा अनुच्छेद 370 रद्द केल्याने तुर्कीचे पंतप्रधान एर्दोगन यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. तसेच पाकिस्तानसोबतच्या तणावावर तोडगा काढण्याचे वक्तव्य केले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीचा नियोजित दौरा रद्द केला होता. 

फेब्रुवारी 2020 मध्ये एर्दोगन यांनी पाकिस्तान दौऱ्यावेळी काश्मीर मुद्द्याचे इस्लामाबादच्या बाजुने समर्थन केले होते. तसेच दुसऱ्या विश्वयुद्धातील आपल्या देशाच्या परिस्थितीची तुलना त्यांनी सध्याच्या काश्मीरसोबत केली होती. यावर भारताने तुर्कीला चोख प्रत्यूत्तर दिले होते. निवडणुका असल्याने असली वक्तव्ये त्यांना करावी लागतात. त्यांची स्वत:ची काहीतरी मजबुरी असेल असे भारताच्या तुर्कीतील माजी  राजदुतांनी सुनावले होते.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी