‘दीपावली’वर अमेरिकेत टपाल तिकिटाचे प्रयत्न

By Admin | Updated: September 26, 2015 22:01 IST2015-09-26T22:01:52+5:302015-09-26T22:01:52+5:30

अमेरिकेत तेथील टपाल खात्याने दीपावलीच्या निमित्ताने टपाल तिकीट जारी करावे, अशी मागणी भारतीय नागरिकांनी केली आहे.

Trying to pay a stamp in the United States on Deepawali | ‘दीपावली’वर अमेरिकेत टपाल तिकिटाचे प्रयत्न

‘दीपावली’वर अमेरिकेत टपाल तिकिटाचे प्रयत्न

न्यूयॉर्क : अमेरिकेत तेथील टपाल खात्याने दीपावलीच्या निमित्ताने टपाल तिकीट जारी करावे, अशी मागणी भारतीय नागरिकांनी केली आहे. असे टपाल तिकीट जारी करावे, अशी विनंती करणारे पत्र अध्यक्ष ओबामा यांना लिहिण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी राजी झाले आहेत.
मोदी यांनी ओबामा यांना असे पत्र लिहावे, अशी विनंती न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या रंजू आणि रवी बत्रा यांनी केली होती. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या वेळी त्यांनी मोदी यांची भेट घेतली. तेव्हा त्यांची विनंती मोदी यांनी मान्य केली.

अमेरिकी टपाल खात्याने दिवाळीच्या निमित्ताने ‘टपाल तिकीट’ जारी करावे यासाठी रंजू यांनी मोहीम चालविली आहे. यानिमित्ताने त्यांनी काँग्रेसचे सदस्य कॅरोलीन मैलोनी यांच्याशीही चर्चा केली होती. त्यानिमित्ताने रंजू यांना पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली होती. त्यातच त्यांनी मोदींनी ओबामांना पत्र लिहिण्याची विनंती केली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Trying to pay a stamp in the United States on Deepawali