भारतीयाचे दुकान जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2017 00:40 IST2017-03-13T00:40:09+5:302017-03-13T00:40:09+5:30
फ्लोरिडामध्ये भारतीय-अमेरिकनांच्या मालकीचे दैनंदिन गरजेच्या वस्तुंचे दुकान रिचर्ड लॉईड (६४) यांनी शुक्रवारी पेटवायचा प्रयत्न केला.

भारतीयाचे दुकान जाळण्याचा प्रयत्न
वॉशिंग्टन : फ्लोरिडामध्ये भारतीय-अमेरिकनांच्या मालकीचे दैनंदिन गरजेच्या वस्तुंचे दुकान रिचर्ड लॉईड (६४) यांनी शुक्रवारी पेटवायचा प्रयत्न केला. हे दुकान मुस्लिमांच्या मालकीचे असल्याचा त्याचा समज झाला होता.
‘अरब आमच्या देशातून निघून गेले पाहिजेत’ अशी भूमिका असलेल्या रिचर्ड लॉईड यांनी पोर्ट लुईस स्टोअरसमोर कचरा टाकायची गाडी आणून ठेवली व तिला पेटवले. हा प्रकार घडला त्यावेळी दुकाने उघडलेले नव्हते व अग्निशमन दलांनीही तत्काळ आग विझवली. मालमत्तेची हानी यात झाली नाही.
लॉईड यांना या दुकानाचे मालक अरेबिक असावेत असे प्रथमत: वाटले. वस्तुत: दुकानाचा मालक हा भारतीय वंशाचा आहे, असे सेंट लुसी सरगण्याचे प्रमुख केन मस्करा म्हणाले. लॉईड याच्या मन:स्थितीचे मूल्यमापन केले जाईल व हा वंशद्वेषातून घडलेला गुन्हा आहे का याचा निर्णय स्टेट अॅटर्नी यांच्या कार्यालयातून होईल. ‘या दुकानात मी काही दिवसांपूर्वी बाटली विकत घ्यायला गेलो असताना ती नसल्याचे मला सांगण्यात आले. येथे मुस्लिम कर्मचारी असल्यानेही मी नाराज होतो’, असे स्वत: लॉईड यांनी चौकशी करणाऱ्यांना सांगितले होते.