ट्रंकेत गुदमरून प्रियकराचा मृत्यू!

By Admin | Updated: July 11, 2016 04:19 IST2016-07-11T04:19:33+5:302016-07-11T04:19:33+5:30

प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री तिच्या घरी चोरून गेला खरा. पण त्याच्या आवाजाने घरातील इतर लोक जागे झाले. त्यामुळे घाबरून गेलेल्या प्रेयसीने आपले बिंग फुटू नये यासाठी प्रियकरास घरातील

Trunk cock! | ट्रंकेत गुदमरून प्रियकराचा मृत्यू!

ट्रंकेत गुदमरून प्रियकराचा मृत्यू!


मुलतान (पाकिस्तान) : प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री तिच्या घरी चोरून गेला खरा. पण त्याच्या आवाजाने घरातील इतर लोक जागे झाले. त्यामुळे घाबरून गेलेल्या प्रेयसीने आपले बिंग फुटू नये यासाठी प्रियकरास घरातील एका मोठ्या ट्रंकेत दडविले. पण दुर्दैवाने ट्रंकेतच गुदमरून प्रियकराचा मृत्यू झाला.
एखाद्या चित्रपटास साजेसे हे करुण नाट्य मध्य पाकिस्तानमधील मुज्जफरगढ गावात शनिवारी रात्री घडले.
तेथे राहणाऱ्या राणी बीवी या दोन मुलांची आई असलेल्या विवाहितेचे तिचाच लांबचा नातेवाईक असलेल्या मुश्ताक अहमद बलोच या २२ वर्षांच्या विवाहित पुरुशाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. शनिवारी रात्री राणी बीवीच्या घरातील इतर मंडळी झोपलेली असताना मुश्ताक तिला भेटण्यासाठी चोरून तिच्या घरात शिरला. मुश्ताकच्या घरात शिरण्याच्या आवाजाने व त्याच्या आणि राणी बीवीच्या कुजबुजीने घरात झोपलेले राणी बीबीचे सासरे व दोन दीर जागे झाले. दोन्ही प्रेमिकांवर मोठा बांका प्रसंग गुदरला. घाबरून गेलेल्या राणी बीवीने बिंग फुटू नये म्हणून मुश्ताकला आपल्या खोलीतील पत्र्याच्या एका मोठ्या ट्रंकेत दडविले व ट्रंकेची कडी लावून घेतली.
घरात कोण शिरले आहे हे पाहण्यासाठी राणी बीवीचे सासरे व दीर तिच्या खोलीत आले. तोपर्यंत ट्रंकेत गुदमरून मुश्ताकचे प्राण कंठाशी आले होते. त्याने आतून ट्रंक उघडण्याची याचना सुरू केली.
काय प्रकार झाला आहे हे लक्षात आल्यावर सासरे व दीराने
राणी बीबीला ट्रंक उघडू दिली नाही व स्वत:ही ती उघडली नाही. गुदमरलेल्या मुश्ताकचा १५ मिनिटांनी ट्रंकेत मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Trunk cock!