शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 05:37 IST

एस अँड पी व नॅसडॅक निर्देशांकात एप्रिलनंतर पहिल्यांदाच घसरण दिसून आली, तर डाऊची घसरण मे नंतरची सर्वाधिक मानली जाते. ट्रम्प यांनी सर्वप्रथम एप्रिलमध्ये चीनला टॅरिफची धमकी दिली होती. त्यावेळी बाजार घसरला होता.  

वॉशिंग्टन : चीनवर १०० टक्के अतिरिक्त आयात कर लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा परिणाम अनपेक्षितपणे अमेरिकेच्या शेअर बाजारावर शुक्रवारी दिसून आला. बाजारामध्ये सर्वत्र घसरण दिसून आली. डाऊ निर्देशांक ८७९ अंशाने (१.९%), एस अँड पी ५०० अंशाने (२.७%) व नॅसडॅक ३.५६ टक्क्याने घसरला.

तब्बल १.५६ ट्रिलियन डॉलरचा फटकाएस अँड पी व नॅसडॅक निर्देशांकात एप्रिलनंतर पहिल्यांदाच घसरण दिसून आली, तर डाऊची घसरण मे नंतरची सर्वाधिक मानली जाते. ट्रम्प यांनी सर्वप्रथम एप्रिलमध्ये चीनला टॅरिफची धमकी दिली होती. त्यावेळी बाजार घसरला होता.  

एस अँड पीच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १.५६ ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले. एनविडिया व ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइस यांच्या समभागात ४.९५ व ७.७८ टक्के घसरण झाली.  अमेरिकेत तेलाच्या किमतीत ४.२ टक्क्याने वाढ झाली तर ब्रेटन क्रूड ३.८ टक्क्याने घसरला. शेअर बाजारातील ही मे नंतरची सर्वाधिक घसरण मानली जात आहे. 

टॅरिफवरून चीनशी तणाव वाढत चालल्याचे हे लक्षण असून बाजारपेठेला हा अनपेक्षित धक्का असल्याची प्रतिक्रिया अर्थ विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's China Tariff Threat Triggers Market Crash; Worst Drop Since April

Web Summary : Trump's tariff threat against China unexpectedly crashed US stock markets. Dow, S&P 500, and Nasdaq plummeted, wiping out $1.56 trillion. This marks the worst drop since April for S&P and Nasdaq, and since May for Dow, signaling rising trade tensions.
टॅग्स :AmericaअमेरिकाchinaचीनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पTrade Tariff Warटॅरिफ युद्ध