Donald Trump on Strait of Hormuz: "इराणच्या किनाऱ्यावर अमेरिका जोरदार बॉम्ब वर्षाव करत राहील आणि इराणच्या बोटी व जहाजे सातत्याने उद्ध्वस्त करेल. कोणत्याही परिस्थितीत आम्ही लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली करू, सुरक्षित आणि मुक्त करू", असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझसाठी इराणविरोधात दंड थोपटले आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करणाऱ्या तेल जहाजांवर इराणकडून हल्ले केले गेले. त्यामुळे सर्वच देशांनी सामुद्रधुनीतून वाहतूक थांबवली आहे. इराणने तीन जहाजांवर हल्ले केले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक ठप्प झाल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे.
त्या देशांनीही युद्धनौका पाठवाव्यात -ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या केलेल्या प्रयत्नामुळे प्रभावित झालेले अनेक देश, ही सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेच्या सोबतीने आपल्या युद्धनौका पाठवतील."
"आम्ही इराणची १०० टक्के लष्करी क्षमता आधीच नष्ट केली आहे, परंतु त्यांचा कितीही मोठा पराभव झालेला असला तरीही, त्यांच्यासाठी एखादा-दुसरा ड्रोन पाठवणे, पाण्यात सुरुंग पेरणी करणे किंवा या जलमार्गावर कुठेतरी कमी पल्ल्याची मिसाईल डागणे सोपे आहे", असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आम्ही बॉम्बचा वर्षाव करू, ट्रम्प यांचा इराणला इशारा
"या कृत्रिम अडथळ्यामुळे ज्यांच्यावर परिणाम झाला आहे, असे चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि इतर देश या भागात आपल्या नौका पाठवतील अशी आशा आहे; जेणेकरून पूर्णपणे नामोहरम झालेल्या राष्ट्राकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीला पुन्हा कधीही धोका निर्माण होणार नाही", असे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे.
ट्रम्प यांनी पुढे म्हटले आहे की, "दरम्यानच्या काळात अमेरिका इराणच्या किनारपट्टीवर जोरदार बॉम्बफेक सुरूच ठेवेल आणि इराणच्या बोटी व जहाजे उद्ध्वस्त करत राहील. कोणत्याही परिस्थितीत आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली, सुरक्षित आणि मुक्त करू", असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील तेल व्यापारापैकी २० टक्के तेलाची वाहतूक होते. भारतासह अनेक देशात या सामुद्रधुनीच्या मार्गे तेल, गॅस जाते. पण, इराणकडून हल्ले होत असल्याने जगातील अनेक देशात टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
Web Summary : Trump vowed to open the Strait of Hormuz after Iranian attacks on oil tankers. He threatened heavy bombing of Iranian coasts and vessels, urging allies to send warships to secure the vital waterway, critical for global oil transport.
Web Summary : तेल टैंकरों पर ईरानी हमलों के बाद ट्रंप ने होर्मुज जलडमरूमध्य को खोलने की कसम खाई। उन्होंने ईरानी तटों और जहाजों पर भारी बमबारी की धमकी दी, सहयोगियों से महत्वपूर्ण जलमार्ग को सुरक्षित करने के लिए युद्धपोत भेजने का आग्रह किया।