सत्तांतर घडवण्याच्या इराद्याने अमेरिका आणि इस्राइलने शनिवारपासून इराणमध्ये जोरदार हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. सत्तांतरासोबतत इराणमधील तेलसाठ्यांवर वर्चस्व मिळवण्याच्या इराद्याने अमेरिकेने हे हल्ले केल्याचे सांगण्यात येत आहेत. याबरोबरच इराणच्या समुद्र किनाऱ्यावरील रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ३४ किलोमीटरच्या चिंचोळ्या भागावरही डोनाल्ड ट्रम्प यांचा डोळा आहे. हा भाग ताब्यात आला तर संपूर्ण जगाची वेसण डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात येणार आहे.
त्यामुळेच इराणवर हल्ला करण्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा हेतू केवळ तेलापुरताच नाही आहे. तर जगातील २० टक्के व्यापार ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होतो त्या सागरी मार्गावर कब्जा करण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे. या मार्गावर कब्जा केल्यास या भागातून होणारा २० टक्के व्यापार डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियंत्रणात येणार आहे.
अवघी ३४ किमी रुंदी असलेल्या या चिंचोळ्या मार्गातून सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, इराक या ओपेक देशांमधील खनिज तेलाची निर्यात होते. या मार्गाने दररोज २० मिलियन बॅरल तेलाची वाहतूक होते. तसेच जगभरातील एक तृतियांश एलएनजीची याच भागातून निर्यात होते. त्यामुळे या मार्गावर कब्जा केल्याने आखाती देशांवर नियंत्रण ठेवणारी वेसण अमेरिकेच्या हातात येणार आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीचं व्यापारीदृष्ट्या एवढं महत्त्व आहे की, हा मार्ग बंद केला तर जगातील खनिज तेलाच्या किमती भडकून त्या १०० डॉलरच्या वर जाऊ शकतात. सद्यस्थितीत इराण होर्मुजच्या आखातावर इराणचं नियंत्रण आहे. याचाच फायदा उचलत इराणने इस्राइलच्या हल्ल्यानंतर हा मार्ग बंद केला होता.
कशी आहे होर्मुझची सामुद्रधुनीहोर्मुझची सामुद्रधुनी हा भौगोलिक दृष्ट्या केवळ २१ मैलांचा मार्ग आहे. ही सामुद्रधुनी पर्शियन समुद्राला हिंदी महारागराशी जोडते. इराण आणि ओमान यांच्यादरम्यान, हा अरुंद मार्ग आहे. मात्र याच चिंचोळ्या मार्गावरून जगभरातील बहुतांश तेलाची वाहतूक होते. त्यामुळेच या मार्गाला जगभरातील उर्जेच्या व्यापाराची लाईफलाईन म्हटलं जातं. तसेच इराण या होर्मुझच्या सामुद्रधुनीचा इराण एका हत्याराप्रमाणे वापर करत आला आहे. या मार्गावर इराणची मजबूत पकड आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांना हेच हत्यार आपल्या ताब्यात घ्यायचं आहे.
Web Summary : US aims to control Iran's oil and the Hormuz Strait, a 34km waterway crucial for 20% of global trade. Control of this strait, a key oil export route, would give the US significant influence over global energy markets and Gulf nations.
Web Summary : अमेरिका का लक्ष्य ईरान के तेल और होर्मुज जलसंधि पर नियंत्रण करना है, जो वैश्विक व्यापार का 20% है। इस जलसंधि, जो प्रमुख तेल निर्यात मार्ग है, पर नियंत्रण से अमेरिका को वैश्विक ऊर्जा बाजारों और खाड़ी देशों पर महत्वपूर्ण प्रभाव मिलेगा।