शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 21:27 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनविरुद्ध युद्ध थांबवण्यासाठी शेवटची संधी दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनविरुद्ध युद्ध थांबवण्यासाठी शेवटची संधी दिली आहे. युक्रेनवरील हल्ले थांबवण्यासाठी रशियाकडे फक्त १० ते १२ दिवस आहेत, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. शिवाय, ते पुतिन यांच्यावर खूप नाराज आहेत आणि त्यांच्याशी बोलू इच्छित नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सोमवारी स्कॉटलंडमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, "मी पुतिन यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. नेहमीच आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर मला नेहमी असे  वाटायचे की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपले आहे. पण त्यानंतर पुतिन हे युक्रेनवर हल्ला करतात."

पुढे ट्रम्प म्हणाले की, "मी पुतिन यांच्यावर खूप नाराज आहे. मी त्यांना युद्ध थांबवण्यासाठी दिलेली ५० दिवसांची मुदत कमी करत आहे.  कारण, पुढे काय होणार आहे, याची मला चांगली कल्पना आहे. त्यामुळे वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. पुढील १० ते १२ दिवसांत रशियाने युद्ध संपवावे, अशी आमची इच्छा आहे. पण अद्यापही रशियाकडून कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया आली नाही."

याआधी ट्रम्प यांनी रशियाला युद्ध थांबवण्यासाठी ५० दिवसांची मुदत दिली होती. या कालावधीत रशियाने क्रेनवर हल्ला थांबवला नाही तर, अमेरिका रशियावर १०० टक्के कर लादेल. दरम्यान, ट्रम्प यांनी युक्रेनला मदत करण्यासाठी पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टम पुरवण्याची घोषणाही केली होती. मात्र, अजूनही रशियाकडून कोणाताही प्रतिसाद न मिळल्याने ट्रम्प यांनी त्यांना दिलेली मुदत कमी केली आहे.

टॅग्स :warयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया